संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – बंदी असलेले गोवंशी जातीच्या १ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे ९०० किलो गोमास खाटीक गल्ली (ता. संगमनेर) येथून जप्त करून अहमदनगर स्थानिक गुन्हेने मोठी कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
आदेशान्वये एलसीबीचे पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, परि.पोसई संदीप ढाकणे, परि.पोसई विठ्ठल पवार, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना शंकर चौधरी, सचिन आडबल, विशाल दळवी, भिमराज खर्से, राहुल सोळुंके, पोकॉ रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड यांना बोलावून संगमनेर शहरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथकास तात्काळ रवाना केले. पथक संगमनेर शहर व परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना सपोनि दिनकर मुंडे यांना माहिती मिळाली की, खाटीक गल्ली, आसुरखाना शेजारी, मोळ्या जागेत (ता. संगमनेर) येथे गोवंश जातीची जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून त्यांची कत्तल करुन, कब्जात बाळगून विक्री करत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सपोनि मुंडे यांनी माहिती पोनि श्री. अनिल कटके यांना कळविली.
पोनि श्री. कटके यांनी माहिती प्राप्त होताच सपोनि मुंडे यांना संगमनेर येथील पशुवैद्यकिय अधिकारी व पंच यांना सोबत घेवुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन लागलीच कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकाने संगमनेर येथील पशुवैद्यकिय अधिकारी व दोन पंचासोबत घेऊन खाटीकगल्ली (ता. संगमनेर) येथे जाऊन खात्री करता आसुरखानाचे शेजारी आडोशाला मोकळ्या जागेत काहीजण गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल करुन मास तोडतांना दिसल्याने अचानक छापा टाकला. काहीजणांना जागीच पकडले. तीनजण पळून जाऊ लागले. पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलगा करता त्यातील एकास शिताफीने ताब्यात घेतले. इतर दोनजण पळून गेले. पळून गेलेल्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.
ताब्यात घेतलेल्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी सगीर बुढान कुरेशी ( वय ४०, खाटीक गल्ली, ता. संगमनेर), मुशफिक मजरुल शेख ( वय ५०, रा. भारतनगर, ता. संगमनेर), मतीन बशीर कुरेशी (वय ३५), फयीम खालीद कुरेशी (वय ३५, दोन्ही रा. मुगलपुरा, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गोवंश कत्तलखानाबाबत चौकशी केली, यावेळी त्यांनी आम्ही मिळून कत्तलखाना चालवतो. गोमांस विक्री करत असल्याची कबुली दिल्याने १ लाख ८१ हजार हजार रु.किंमतीचे ९०० किलो गोमास, दोन सुने व दोन कु-हाड असे मुद्देमालासह जप्त करुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ९४२/२०२२ भादविक २६९,३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल ५ (क),९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस करीत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार ही कारवाई केली आहे.