संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे – येथील सिंहगड रोडवरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात राज्यातील ओबीसी VjNT समाजातील विविध समूहांच्या संघटनांची राज्यव्यापी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती यांचे नोकरीतील प्रमोशनसाठीचे आरक्षन हे असंविधानिक असल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले शपथपत्र यावर सर्वच मान्यवरांनी तीव्र आक्षेप आणि संताप नोंदविला.
या बैठकीत घेतलेले निर्णय याप्रमाणे जातनिहाय जनगणना तात्काळ सुरू व्हावी यासाठी राज्यभर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी व्ह्यूवचना तयार करणार. ओबीसीचे राजकीय आरक्षण घालविण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे सारखीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधनार प्रसंगी दबावतंत्र अखणार . हे आरक्षण वाचविण्यासाठी आवश्यक इम्परिकल डाटा गोळा करणाऱ्या राज्य मागासवर्गीय आयोगाला तात्काळ बजेटमधील रू. 435कोटी निधी देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना भेटून ओबीसी VJNT ची बाजू मांडणार आहोत.
तसेच केंद्र सरकारला विनंती करून न्यायालयांमध्ये आवश्यक असणारा जनगणनेचा डाटा तात्काळ द्यावा म्हणून संघटनात्मक पद्धतीने दबाव निर्माण करणार. विमुक्त जाती व भटक्या जमाती चे प्रमोशन मधील आरक्षण विरोधी राज्य सरकारचे शपथपत्र तात्काळ दुरुस्त करून, सुधारित शपथपत्र पुन्हा न्यायालयात सादर करावे आणि आरक्षण वाचवावे. राज्यातील सर्व ओबीसी VJNT समाजातील विविध संघटना, गट-तट बाजूला ठेवून एकत्रित लढा उभारणार आहोत, अस ओबीसी व्हीजे एनटी चळवळीचे राज्य समन्वयक तथा दसरा मेळावा संयोजन समितीचे प्रमुख नवनाथ पडळकर यांनी केली.
या बैठकीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी आज महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले आणि रामस्वामी पेरियार यांच्या विचारांची गरज असून तामिळनाडू त्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी चा सामाजिक व राजकीय लढा उभा करण्याचा विचार प्रकट केला. आता केवळ जातींची बेरीज नाही तर विचारांची देखील बेरीज करणे ओबीसीला गरजेचे आहे अशी भूमिका मांडली.
ज्येष्ठ नेते सुधाकरराव आव्हाड यांनी वारकरी संप्रदायात बहुजन समाजाच्या ऐक्याची बीजे पेरली गेल्याची आठवण करून देत आज ओबीसीला एकत्र येण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून प्रेरणा मिळेल ही भावना व्यक्त केली. त्याच बरोबर आता हा कायदेशीर लढा देखील ओबीसी ना लढावा लागेल ही भूमिका मांडली.
बैठकीचे निमंत्रक नवनाथ पडळकर यांनी आपली भूमिका मांडताना ओबीसी VjNT यांना आज पर्यंत सर्वच प्रस्थापित आणि विस्थापित पक्षांनी वापरून घेतले परंतु त्यांच्या प्रश्नाची कायमची उकल कोणीच काढली नाही, म्हणून ओबीसी VJNT समूहाने आता कोणाच्या वळचणीला न जाता, दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतःचा लढा स्वतःच उभा करावा , स्वतःची जनगणना करून घेण्यासाठी आवश्यक सर्व मार्ग तयार ठेवावेत.
ओबीसींच्या आरक्षणात कोणत्याही सबल पुढारलेल्या समाजाची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी ओबीसीचे संघटन अत्यावश्यक आहे. अशी घुसखोरी येत्या काळात होऊ देणार नाही. अशी भूमिका त्यांनी मांडली.
या बैठकीला प्रा श्रावण देवरे, सुधाकरराव आव्हाड, राजेश आंधळे , डॉ पी.बी.कुंभार, दशरथ कुलधर, पै. आप्पासाहेब आखाडे, रामभाऊ मरगळे, संतोष आंबेकर, भरत लोहकरे, संजय हाके, अशोक कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते