ओबीसींच्य राज्यव्यापी एल्गार मेळाव्यास दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी नगर शहरात एल्गार मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

ओबीसींच्य राज्यव्यापी एल्गार मेळाव्यास दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी नगर शहरात एल्गार मेळाव्याची जय्यत तयारी सुरू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर‌– आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असल्याने नगर शहरात शनिवारी (दि. ३) ओबीसी भटके विमुलांना राज्यव्यापी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.कोठी, स्टेशन रोड वरील क्लेराब्रूस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी दूपारी तीन वाजता हा मेळावा होणार असून, या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन आहेत.तर प्रमुख उपस्थितीत आ.गोपीचंद पडळकर,महादेव जानकर,आ.प्रकाश शेंडगे, विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार,आ.राम शिंदे,कल्याणराव दळे,माजी आमदार नारायण मुंडे,पी.टी.चव्हाण, बबनराव तायवाडे,शब्बीर अन्सारी,लक्ष्मण गायकवाड, दौलतराव शितोळे आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेच्या पार्श्र्वभूमीवर भुजबळ या सभेत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबईत राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. मात्र,याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून आक्रमक भूमिका घेतली आहे.झुंडशाहीच्या बळावर कायदे करता येणार नाहीत.ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात झाली असून ती थांबवावी.अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

मेळाव्याची जय्यत तयारी
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर प्रथमच हा मेळावा होणार असल्याने या मेळाव्यात भुजबळ काय भूमिका मांडतात,तसेच भुजबळ यांनी घेतलेल्या मराठा आरक्षणविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर होणा-या टीकेला तसेच मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीलाही ते काय उत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या राज्यव्यापी मेळाव्याची ओबीसी समाजाकडून जय्यत तयारी सूरु असून, मेळावा यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून नको तर वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केला आहे.या पार्श्वभूमीवर नगर शहरात ओबीसी, भटके-विमुक्तांचा राज्यव्यापी एल्गार मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!