निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवार निवडले जावेत म्हणून राज्य सरकारने 1977 मध्ये संभाजीनगर या ठिकाणी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून उमेदवाराची एनडीए साठीची बौद्धिक व शारीरिक तयारी करुन घेतली जाते.
या संस्थेत इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश दिला जातो व अकरावी बारावी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम व सोबतीला एनडीए ची विशेष तयारी करुन घेतली जाते.
यावर्षी दहावीची परिक्षा देणारे विद्यार्थी या प्रवेश परीक्षा साठी अर्ज करु शकतात. आॅनलाईन प्रवेश अर्ज www.spiaurangabad.com या साईट् वर उपलब्ध आहे.उमेद्वार दहावीत शिकत असावा,तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा,त्याचा जन्म 1 जुलै 2006 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान चा असावा.दरवर्षी या संस्थेचे वीस ते बावीस उमेदवार एनडीए साठी निवडले जातात. अशाप्रकारे आतापर्यंत साडे पाचशे उमेदवार एसपीआय संभाजीनगर च्या माध्यमातून एनडीए मध्ये दाखल होत सैन्य दलात अधिकारी झाले आहेत.
👉मुलींना देखील संधी
एनडीए ची दरवाजे मुलींसाठी खुले झाल्यामुळे यावर्षी एसपीआय मध्ये मुलींना सुध्दा प्रवेश मिळणार आहे. यासाठी. एसपीआय च्या नाशिक शाखेत मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. मुलींना www.girlspinashik.com या साईट वर अर्ज भरत येईल. दि.9 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर मेरीट नुसार मुलाखती व अंतिम प्रवेश निश्चित होतील.