संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – एसटी महामंडळाचे कळंब आगारमधील चालक कल्याण कुंभार व वाहक मंगल सागर गिरी यांच्याकडून अनवधानाने काही चुकी झाली असेल तर त्याचे निलंबन न करता एकदा कायदेशीर समज (सक्त ताकीत) द्यावी. देशाच्या संविधानाच्या कलम 19A नुसार आचार विचार स्वातंत्र्यावर गदा येत आहे.त्यांच्या पूर्ण कुटूंबाच्या उपजिवीकेच्या दृष्टीने एकमेव साधन नोकरी आहे, तरी हा अधिकार हिरावून घेऊ नये, अन्यथा राज्यात आंदोलने करू असा इशारा ही अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शाहु, फुले, आंबेडकर, साठे, कलाम, सामाजिक विचार मंचाच्या वतीने दिला आहे. निवेदन नुकतेच अहमदनगर गृहशाखेचे नायब तहसिलदार राजेंद्र दिवान यांना देण्यात आले.
यावेळी मंचाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनिल सकट,मानवी हक्क अभियानचे शहर जिल्हाध्यक्ष अशोक भोसले,उमंग फाऊंडेशनचे डॉ.संतोष गि-हे, भ्रष्टाचारी विरुद्ध जन आंदोलनचे बबलु खोसला, ग्राहक मार्गदर्शनचे जिल्हाध्यक्ष अल्लाउद्दीन (भैय्या) पठाण, पोपट भोसले, गणेश आटोळे आदिंसह विविध संघटनेच्या पदाधीकारी, कार्यकर्त्यांच्या यावेळी उपस्थित होते.