संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर येथे नव्याने एलसीबी कार्यालयात पोनि दिनेश आहेर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कारवाईचा शुभारंभ केला आहे. कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यातील कोपरगांव, शिर्डी, लोणी व संगमनेर येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चैन स्नॅचिंग चोरी करणारे तीन आंतरराज्य सराईत आरोपींची टोळी ‘अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडली आहे. या पकडण्यात आलेल्या टोळीकडून 13.2 तोळे (132 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, एक स्कॉर्पिओ व दोन स्पोर्ट्स बाईक असा एकूण 18 लाख 42 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमनाथ मधुकर चोभे (वय 33, मुळ रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर हल्ली रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव), सिध्दार्थ बारसे (मुळ रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर), नाना चव्हाण (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शिर्डी तथा अतिरिक्त प्रभारी संगमनेरचे डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि गणेश वारुळे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, विश्वास बेरड, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदीप दरदंले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, पोकॉ/रणजीत जाधव, जालिंदर माने, मयुर गायकवाड, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.