संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः अॅमेझॉन कंपनीच्या पैशाची चोरी करणा-यास पकडण्याची कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. मुन्ना उर्फ विनय विवेंद्र चौधरी असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्र.सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोसई दिपक पाठक, पोसई राजेंद्र गायकवाड, पोना विजय नवले, पोना संदीप चव्हाण, पोना मिसाळ, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ. सचिन हरदास, पोकॉ. नवनाथ दहिफळे आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.2 मे2023 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वेळोवेळी पितळे कॉलनी नागापुर एमआयडीसी अहमदनगर येथील पूजा ट्रान्सपोर्ट येथे कामास असलेल्या आरोपी मुन्ना उर्फ विनय विवेंद्र चौधरी याने पार्सलचे 3 लाख रुपये हे अॅमेझॉन पार्सलचे बँकेत न भरता त्याची चोरी केली आहे, या सुशांत सुनिल शिंदे (वय 33 रा.शारगा बंगलो हिल टॉप सोसायटी धनकवाडी पुणे) यांच्या फिर्यादीवरून अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं 520/2023 भादवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की, गुन्हा केला असलेला आरोपी नागापुर येथे आलेला आहे. त्यावेळी एमआयडीसी पोलीसांच्या पथक तयार करुन त्यास पकडले. त्याला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुन्ना उर्फ विनय बिबेंद्र चौधरी (वय34 रा. घर नंबर 4520 लेन नंबर 13 कानिफनाथ कॉलनी गंगानगर फुरसुंगी पुण)े असे सांगितले. त्यास गुन्ह्यात अटक केली असून, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.