संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील एमआयडीसी परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणार-या दोन सराईत गुन्हेगार जालना येथून पकडून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.
गजानन उर्फ गजु विष्णु गवारे (रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना), ऋषिकेश नवाजी गांगर्डे (रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्र. सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोसई राजेद्र गायकवाड, सफौ रावसाहेब लोखंडे, पोना आंधळे, पोकॉ किशोर जाधव, पोकाॅ सुरज देशमुख, पोकाॅ सचिन हरदास तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना रिंकु मढेकर, पोकॉ प्रशांत राठोड, पोकॉ नितीन शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.