
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : के.के रेंजमधून गौण खनिज चोरी करणारा डंपर व गौण खनिजासह ८ लाख १० हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोसई गायकवाड,पोहेकॉ संदिप खेंगट, पोहेकॉ समीर सय्यद यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२४ मार्च २०२३ च्या रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिस नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना, या दरम्यान निंबळक चौक ते सनफर्मा जाणारे डाबरी रोडवर सावली हॉटेलपुढे (ता.जि अ,नगर) गणेश शेषराव नागरे (रा गाडगीऴ पटांगण नालेगाव ता जि अ,नगर) त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा डपर ( एमएच १२ -ई एफ १२६६) डंपरमध्ये विनापरवाना ३ ब्रास गौण खनिज मुरुम चोरुन घेऊन विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला आहे, या एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संदिप खेंगट यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं २३४/२०२३ भादवि कलम,३७९ पर्यावरण संरक्षण अधिनीयम १९८६ चे कलम १५,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.