
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावर ६ ठिकाणांच्या हाॅटेलवर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यात ४३ हजार ३० रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली. हॉटेल न्यु सम्राट, हॉटेल राजयोग खोसपुरी, हॉटेल महालक्ष्मी, हॉटेल किनारा, हॉटेल जंगदबा या हाॅटेलवर कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ श्री देशमुख, पोना दिपक गांगर्डे, पोना पांढरकर, पोकॉ किशोर जाधव, सचिन हरदास पोकॉ भगवान वंजारी, पोकॉ तांदळे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी दि.१३ मे२०२३ला नगर एमआयडीसी व औरंगाबाद महामार्गावरील ६ हाॅटेलमध्ये चोरुन देशी विदेशी दारुची विक्री होत आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली होती, त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकले. या छापेमारीत महामार्गावरील ६ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत गणेश गोरख विरकर (वय ३८, रा. जेऊर बायजाबाई ता.जि. अहमदनगर), सागर नारायण पवार (वय ३२, रा चाफेवाडी जेउर बायजाबाई ता.जि अहमदनगर), पंकज मच्छिद्र निकम (वय २६ रा वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर), देविदास जगन्नाथ येवले (वय ३४, रा. जेउर बायजाबाई ता. जि.अहमदनगर), अविनाश मधुकर डोंगरे (वय ३५, रा वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर), गोकुळ प्रकाश बांगर (वय २४, रा जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) आदिंवर कारवाई करुन ४१६ / २०२३ महाराष्ट्र दारुंबदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.