एमआयडीसीमधील उद्योजकांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा

आमी संघटनेतील सभासदांशी आमदार संग्राम जगताप यांचे चर्चासत्र संपन्न

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शहरामध्ये विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात यशस्वी झालो आहे, या कामांसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा केला असल्यामुळे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे, निवडणुकीमध्ये कुठलेही काम सुरू झाले नसून दोन वर्षांपूर्वीच कन्सल्टिंग एजन्सी नेमून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आणि तो मंजूर देखील झाला त्यानंतर लोकसभा आणि विधान परिषदेची आचारसंहिता लागली, आता फक्त 6 रस्त्यांची कामे सुरू झाली आहे दिवाळीनंतर शहरात विविध भागात रस्ता काँक्रिटीकरणाची कामे मार्गी लागणार आहे, दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करत आहे, नगर एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी 600 एकर जागा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल, सुरक्षित शहर म्हणून ओळख निर्माण झाली असल्यामुळे बाहेरील शहरामधील बांधकाम व्यावसायिक येत असून कोठे प्रकल्प उभे राहत आहे सह्याद्री नागापूर चौक येथे उड्डाणपुलाचे काम होणार असून डीएसपी चौक येथे कामदेखील सुरू झाले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
एमआयडीसी मधील आमी संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयदार्य खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, अरविंद पारगावकर, सुनील मुनोत, सुमित लोढा, सागर निंबाळकर, राजेंद्र कटारिया, दिलीप अकोलकर, राजेंद्र सुक्रे, नरेंद्र बाफना, गौरव गंधे, अमित पानसरे, सतीश गवळी, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, हरजीतसिंह वधवा, सुमित सोनवणे, निनाद टिपूगडे, मिलिंद कुलकर्णी, दौलतराव शिंदे, दिलीप कर्नावट, अनिल लोढा, किरण कातोरे, रवी बक्षी, सुभाष गुगळे, अदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद पारगावकर म्हणाले की, शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामामुळे आम्ही सर्व उद्योजक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, शहराला महानगराचे रूप देण्यासाठी तुम्ही काम करत आहात, नगर एमआयडीसीमध्ये एक मोठा उद्योग आणावा, जेणेकरून या ठिकाणी 10 हजार युवकांना रोजगार मिळेल त्या माध्यमातून शहराच्या अर्थकारणाला बळ मिळेल उद्योजकांच्या काही समस्या असतात त्या सोडविण्याचे काम तुम्ही करतच आहात, नगरमध्ये आता उद्योग येण्यासाठी तयार आहेत त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले
जयदार्य खाकाळ म्हणाले की, पुणे मुंबई येथील कंपन्यांमध्ये ठेके घेण्यासाठी राजकीय लोकांचा दबाव येत असतो मात्र तो आपल्याला नाही उलट त्रास देणार्‍यांनाच सरळ केलं जातं. आमदार संग्राम जगताप नेहमीच उद्योजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आमी संघटनेचा पाठिंबा आहे असे ते म्हणाले. हरजीत वधवा म्हणले की, एमआयडीसीतील बंद पडलेली आयटी पार्कची बिल्डिंग धुळखात पडली होती काचा फुटल्या होत्या या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नामुळे छोट्याशा प्रमाणात का होईना आयटी पार्क सुरू झाले आहे नगर एमआयडीसी मध्ये एखादी सरकारी कंपनी आणावी तसेच सरकारी मेडिकल कॉलेज देखील पाहिजेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे ते म्हणाले
मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, आपल्या शहराचे काम करणारे लोक कोण आहे त्यांच्याकडे कोणत्या कल्पना आहे हे आपण पाहिले आहे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे व्यापक दृष्टिकोन आहे आणि शहराबद्दल असणारी तळमळ आपुलकी देखील आहे त्यांचे काम आपल्या सर्वांना दिसत असून आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!