एकदा संधी द्या बोधेगाव परिसर जलयुक्त करून दाखवितो ः प्रतापकाका ढाकणे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बोधेगाव ः पाथर्डी शेवगाव तालुक्यातील प्रस्थापितांच्या कारखाना परिसरात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. केदारेश्वर परिसरातला पाण्यासाठी आजचा कित्येक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार असून एकदा संधी द्या, या भागातील पाण्याचा प्रश्न सोडून दाखवितो, असे प्रतिपादन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड़. प्रतापकाका ढाकणे यांनी केले.
संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-2025 च्या मील रोलर च्या पूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रभावती ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, संचालक डॉ.प्रकाश घनवट, रणजीत घुगे, त्रिंबकराव चिमटे, बाळासाहेब फुंदे, मोहन दहिफळे, तालुकाध्यक्ष हरीश भारदे, कार्यकारी संचालक रमेश गर्जेे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, मुख्यालेखापाल तीर्थराज घुंगरट, रामनाथ पालवे, राजेंद्र केसभट आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री ढाकणे म्हणाले मागील 30 वर्षांपासून आपण शेवगाव पाथर्डीतील जनतेसाठी अविरतपणे संघर्ष करत आलो आहे वेळोवेळी जनतेची आपल्याला साथ मिळाली यावर्षीची लढाई मात्र आरपारची असेल मला आमदारकीचा हव्याच नाही मी तुमच्यासाठी लढतोय कारण बोधेगाव परिसराला पाण्याच्या समस्येपासून कायमचे सोडवायचे आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला तर परिसर उजळतो लोकांचे जीवनमान उंचावते त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी आणण्यासाठी मला पाच वर्षे आमदारकी पाहिजे. शेतीच्या पाण्यासाठी गोरेगाव परिसर कसा योग्य आहे याचा रोड मॅप माझ्याकडे तयार असून पाच वर्षात या परिसराला जलयुक्त करून टाकू. स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी बोधेगाव परिसरावर अत्यंत प्रेम केले मात्र मागील पंचवीस वर्षांपासून या परिसरात विकासाचे एकही ठोस काम झाले नाही केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही मूलभूत विकास काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे त्यासाठी तुमची सात महत्त्वाचे आहे केदारेश्वर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी अनेकांनी वेळोवेळी प्रयत्न केले मात्र आपण खंबीरपणे ठाम भूमिका घेऊन शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहिलो असल्याने कारखाना आज व्यवस्थितपणे चालू आहे एक वेळ माझी संपत्ती गहाण ठेवून मी कारखाना वाचविला मात्र शेतकर्‍यांना दुसर्‍यांच्या दारात जाऊ दिली नाही कारण हा ऊस तोडणी कामगारांचा कारखाना आहे यापुढेही आपण सर्वांनी कारखाना वाचविण्यासाठी व पाण्याचा लढा निर्माण करण्यासाठी येणार्‍या काळात मला साथ द्या आणि कसे मिळत नाही हे मी पाहतो तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा असे आवाहन ढाकणे यांनी शेवटी केले.
प्रस्ताविक शरद सोनवणे यांनी केले. आभार माजी संचालक बाळासाहेब कांबळे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!