संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः तहसिल कायार्र्लयासमोर रितसर मागणीसाठी उपोषणास बसले असताना पाथर्डी पोलिसांनी आचारसंहिता सुरु झाल्याने उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी दोघा उपोषणाकत्यार्र्ंना थेट ओढून फरफरटत नेऊन पोलिस ठाण्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या तिघा पोलिस कर्मचार्यांविरुद्ध थेट मुख्य सचिव गृह विभाग (मंत्रालय मुंबई महाराष्ट्र ) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या तिन्ही पोलिस कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगीसाठी अन्यायग्रस्त उपोषणकर्तेे अमोल भाऊसाहेब फुलशेटे (वय 34) व शिवमाला अमोल फुलशेटे (वय 32 रा. वैजू बाबुळगाव ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर) या दोघा पती-पत्नीने गृहविभागाला निवेदन पाठविले आहे.
तक्रारीत अमोल फुलशेटे व पत्नी शिवमाला फुलशेटे या दोघांनी पोलीस शिपाई भगवान मधुकर सानप, पोकॉ लक्ष्मण सुखदेव पोटे, पोलीस शिपाई संभाजी शेटीबा कुसळकर, महिला पोलीस शिपाई अंजू विष्णु सानप (तिघे पाथर्डी पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर) या तिघांनी उपोषणस्थळापासून ओढून नेऊन पाथर्डी पोलिस ठाण्यात मारहाण केली आहे. या प्रकाराबाबत मी यापूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यात परिसर तक्रारी अर्ज केलेले आहेत. परंतु पाथर्डी पोलिसांनी माझ्या भावकितील यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासत त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे मी पुन्हा मला माझ्या मालकीच्या विहिरीतील पाणी घेण्याबाबत कोणीही अडथळा करू नये, म्हणून पोलीस कारवाई होण्यासाठी दि.8 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, तहसीलदार पाथर्डी, महसूलमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मुख्यमंत्री सचिव कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडे रीतसर निवेदन सादर करून संबंधित लोकांवर कारवाई होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यास मागणी केली होती. माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी तहसील कार्यालय पाथर्डी या ठिकाणी मी कुटुंबासह अमरण उपोषणास बसणार असल्याबाबत निवेदनात कळवले होते. त्या निवेदनाची प्रत मी पाथर्डी पोलीस निरीक्षक, तहसीलदार पाथर्डी, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व जिल्हाधिकारी यांना दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेली होती व आहे. गृहविभागाच्या तक्रार अर्जात फुलशेटे पती-पत्नीने पाथर्डी पोलिसांनी कशी मारहाण केली, सविस्तार घटनाक्राम माहिती दिली आहे.
बदली शेवगाव पोलिस ठाण्यात असताना आचारसंहिता
काळात पोलिस कर्मचारी भगवान सानप पाथर्डी कसे हजर ?
उपोषणकत्यार्र्ंना मारहाण करणार्यांपैकी एक पोलिस कर्मचारी भगवान सानप यांची अनेक दिवसांपासून बदली शेवगाव पोलिस ठाण्यात आहे. मग तो पोलिस कर्मचारी भगवान सानप हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात बदली असताना ते पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर कसे होते. ही बाब बेकायदेशीर नाही का? वास्तविक जो उपोषणकत्यार्र्ंना आचारसंहित कायद्याची मािहिती सांगतो, तर स्वतः पोलीस कर्मचारी सानप यांची बदली झालेली असतानाही एसपी राकेश ओला यांनी आदेश दिले असतानाही, या सगळ्याचे आदेश डावलून ते पाथर्डी पोलिस ठाण्यात काय करत होते. त्यांनी स्वतःनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही का? याबाबत एसपी राकेश ओला यांनी चौकशी करणे आवश्यक आहे.