उपमुख्यमंत्री पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुबई –
जरंडेश्वर कारखाना प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संबंधित असललेल्या कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच छापेमारी करण्यात येत आहे. यामध्ये अजित पवार यांच्या बहिणींच्या कार्यालयांवर घरी छापेमारी करण्यात आली आहे. तर अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर देखील धाडसत्र केलं आहे. आयकर विभागाच्या रडावर अजित पवार आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याला बुधवारी भेट दिली होती. यावेळी अजित पवारांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर आज सकाळपासूनच आयकर विभागाने छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयात आयक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी पार्थ पवार यांच्या कार्यालयावर पोहोचले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात छापेमारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि मुक्ता पब्लिकेशनवर देखील कारवाई करण्यात आली आहे. बहिणींच्या घरी आयकर विभागाने का कारवाई करण्यात आली असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला असून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. या छापेमारीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. माझ्या बहिणींच्या घरी कारवाई करण्यात आली आहे. बहिणींचे लग्न ३० -३५ वर्षांपुर्वी झाली आहेत. त्यांच्या मुलांची आणि मुलींची लग्न झाले आहेत. त्यांना नातवंड आहेत. केवळ माझे नातेवाईक म्हणून कारवाई करण्यात आली असली तर हे योग्य नाही याचा जनतेनं जरुर विचार करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असल्याचेही अजित पवारांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की आयकर विभागाची कारवाई उत्तर प्रदेशमधील लखीमपुर घटेवरुन लक्ष हटवण्यासाठी करण्यात येत आहे. सीआरपीएफच्या सुरक्षेत चार कारखान्यांच्या संचालकांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. भाजपचे पुढारी महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे घेऊन बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत. भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा विचार करण्यासारखा भाग आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना त्रास देण्यात आला परंतु न्यायालयाने त्यांना न्याय दिला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सर्व नेते निर्दोष असताना धाडसत्र करुन बदनाम करणं हा भाजपचा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!