सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी ्कार्यालायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका स्तरावरील विविध पदाच्या निवड सोमवार (दि.२७)रोजी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी जाहीर केल्या. यामध्ये टाकळीमानूर गणातील चिंचपूर पांगुळ येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तरुण कार्यकर्ते उद्धव केदार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युवक सरचिटणीस पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. तसे पत्र तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या हस्ते केदार यांस देण्यात आले.

श्री. केदार यांचा प्रतापकाका ढाकणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, महारुद्र कीर्तने, अजय पाठक, डॉ.राजेंद्र खेडकर, डॉ.अशोक बडे आदीसह पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल उद्धव केदार यांचे पाथर्डी तालुक्यातून सर्वच स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.
