उच्चं शिक्षण मंत्रीपद भूषविणारे पाटील महानायकांबद्दल बेजबाबदार विधान कसे काय करू शकतात ? – प्रा. डॉ.गायकवाड

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता –
पदवीधर मतदारसंघा बरोबरच उच्चं शिक्षण मंत्रीपद भूषविणारे चंद्रकांत पाटील हे बहुजन समाजाचे उद्धारक असणाऱ्या महात्मा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महानायकांबद्दल बेजबाबदार विधान कसे काय करू शकतात ? असा परखड सवाल ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयंत गायकवाड यांनी राहाता येथील निषेध सभेत उपस्थित केला.

“भीक मागून शाळा सुरु केल्या” या अतिशय वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राहाता शहरात फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील प्रेमिंकडून उमटले.जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. जयंत गायकवाड, युवा नेते किरण वाघमारे,काँग्रेसचे विशाल वाघमारे,यांच्या नेतृत्वात राहाता शहर पोलीस स्टेशनला अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित शासनाला लेखी निवेदन देण्यात आले.
डॉ. जयंत गायकवाड यांनी महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या थोर कार्याची माहिती देतांना सांगितले की या महान समाज सुधारकांमुळे बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहवचली. पदरमोड करून स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता लाखो बहुजनांना शिक्षनाच्या माध्यमातून पुढे आणले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातही अमूलाग्र बदल या त्रीमूर्ती मुळे घडले. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील करोडो व्यक्ती या तिघांचेही उपकार कृतज्ञतापूर्वक मान्य करतात, सन्मान करतात असे असतांना पदवीधर मतदारसंघा बरोबरच उच्चं शिक्षण मंत्रीपद भूषविणारे चंद्रकांत पाटील असे बेजबाबदार विधान कसे करू शकतात. असा प्रश्न डॉ. गायकवाड यांनी उपस्थित केला.
युवा नेता किरण वाघमारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना म्हटले की बहुजन समाजातील हे महापुरुष आमचे बाप आहेत. आणी बापाचा अपमान करणारे आमच्यासाठी निंदनीय आहेत. समता सैनिक दलाचे मनोज गरबडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी केली.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राहाता तालुका अध्यक्ष यागेश वाघमारे यांनी आपल्या पक्षाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांची मंत्री पदावरून हकालपट्टीची मागणी राज्यभरातून होत असतांना राहत्यातही याचे तीव्र पडसाद उमटल्याचे आजच्या आंदोलनातून स्पष्ट झाले.
यावेळी प्रा.डॉ. जयंत गायकवाड, युवा नेते किरण वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर सीताराम वाघमारे, काँग्रेसचे नेते विशाल यादव, नंदकुमार सीताराम वाघमारे, रमेश शंकर वाघमारे, अशोक रामभाऊ पेटारे, सागर भागवत वाघमारे, दीपक वाघमारे, मयुर पुंड, सोनू त्रिंबक कदम, संदीप कोळगे,नितीन शिवाजी वाघमारे यांचेसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!