संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव: जागतिक महिला दिना निमित्त शेवगाव येथील ‘उचल फाऊंडेशन’ च्या वतीने ऊसतोड कामगार महिला साठी गंगामाई साखर कारखाना येथे दि 9 व 10 मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सुमारे तीनशे पेक्षा जास्त ऊसतोडकामगार महिलांची पूर्णतः मोफत आरोग्यतपासणी औषधोपचार देऊन प्रत्येकी एक माहेरची साडी भेट म्हणून देण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित शंभरहुन अधिक ऊसतोड कामगार पुरुषांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणीत प्रामुख्याने अतिश्रमाच्या कामामुळे महिलांच्या कंबर दुःखी, रक्त कमतरता(ऍनिमिया) हातपायास सूज व मुंग्या येणे, बालविवाह झाल्याने कुपोषित मुले किंवा मृत अर्भक जन्मास येणे. तसेच पुरुषांमध्ये वाढते दारू आणि मावाचे व्यसन, पोषक आहाराची कमतरता, यामुळे येणारा थकवा आणि कॅन्सर सारखे दुर्धर व्यधी, इत्यादी आजार प्रामुख्याने आढळले.
या शिबिरासाठी डॉ. संजयजी लड्डा (जनरल फिजिशिअन), डॉ. मनीषा लड्डा (स्त्रीरोग तज्ञ), प्रा. अण्णासाहेब दिघे(लॅब टेक्निशियन), डॉ. भागीनाथ काटे (फार्मासिस्ट), डॉ.भरत गोरे (नेत्र तंत्रज्ञ सहायक), सौ.सुजाता खेडकर (ICTC समुपदेशक) आदींनी पूर्णतः मोफत वैद्यकीय सेवा दिली.
यावेळी कॉम्रेड संजय नांगरे हेही उपस्थित होते. तसेच उचल फाउंडेशन चे सिद्धार्थ लड्डा, सचिन खेडकर, महारुद्र खेडकर, अक्षय सरगुजर वैभव शिंदे यांनी स्वयंसेक म्हणून काम पाहिले. रोटरी क्लब अॉफ शेवगाव,हॉटेल माथेरानचे गर्जे सर यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभल्याचे उचल फाऊंडेशन चे श्री सचिन खेडकर यांनी सांगितले.