सोमराज बडे,
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. या सप्ताहास आ मोनिका राजळे यांनी श्री वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून १२२ कट्टे (६१क्विंटल) साखर पोती दिली आहेत.
चिंचपूर पांगुळ येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्ताच्या वतीने वृद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी श्री म्हस्के व सहकारी यांचे आभार मानत शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पा,सूर्यभान बडेसर, बंटी बडे,रावसाहेब गीते,नामदेव बडे,ननांवरे, लालाजी बडे,शामराव बडे, ,गहिनीनाथ बडे, मुकादम दरेकर, सोमनाथ बडे,दत्तू नागरगोजे,सोनाजी बडे,प्रकाश बडे,अतुल बडे,आजीनाथ पाराजी बडे,भगवान बडे आदिंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.