👉राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना कार्यकर्त्यांत झाला होता संघर्ष
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जीवन प्राधिकारण विभागाने प्रास्तावित पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून तसेच पोलिस कर्मचाऱ्यास जखमी केल्याप्रकरणी सन २००७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून पारनेरचे आमदार निलेश लंके यांची अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी निर्दोष मुक्तता केली.
विधानसभेच्या २००४ सारी च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांचा पराभव करून शिवसेनेचे विजय औटी हे आमदार झाले होते. तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात पारनेर शहरातील ग्रामीण रूग्णालय तसेच पारनेर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेस मंजुरी मिळून ती कामे सुरू झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने दि.. १८ ऑगस्ट २००७ रोजी दोन्ही कामांचे लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे हे लोकार्पण करणार होते. आमदार विजय औटी यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पारनेर येथे उपोषण सुरू केले होते. नीलेश लंके, लाला साठे व इतर २० जणांनी दुपारी १२ वाजता हंगा शिवारातील पाणी पुरवठा योजनेच्या कोनशिलेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी दिलीप जमदाडे व इधाटे हे जखमी झाले होते. जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकिय कामात अडथळा आणला तसेच दगड मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांच्या जबाबामधील तफावत लक्षात घेता पुरेशा पुराव्यांअभावी आमजार नीलेश लंके व इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आ. लंके यांच्या वतीने अॅड. सतीश गुगळे, अॅड. युवराज पाटील, अॅड. राहुल झावरे, अॅड. स्नेहा झावरे, अॅड. गणेश दरेकर, अॅड. शिवदास शिर्के यांनी काम पाहिले.