संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- वाडीया पार्क अहमदनगर येथे १४ वर्षाखालील अहमदनगर जिल्हासंघांच्या निवड चाचणी आमदार तथा अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार अरूणकाका जगताप यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॅाग्रेस अहमदनगर तथा सहसचिव अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना प्रा.माणिक विधाते, सरचिटणीस अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना गणेश गोंडाळ, मुख्य कोच तथा माजी रणजी खेळाडू अनुपम संकलेचा, निवड समिती सदस्य निरंजन सैंदणकर, रितेश परमार, अजय कविटकर, रोहित जैन व विद्यार्थी राष्ट्रवादी कॅाग्रेस अध्यक्ष वैभव ढाकणे आदि उपस्थित होते.