आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
युवा पत्रकार संघ सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर : बबन महाराज बहिरवाल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आष्टीआष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, तसेच गरीब व अनाथ विद्यार्थांना शैक्षणिक मदत या सह गोरगरीब जनतेला मदत करून समाजोपोयोगी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून इतर पत्रकार संघटनेने ही असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन बबन महाराज बहीरवाल यांनी केले.
शुक्रवार दि ६ जानेवारी या पत्रकार दिनाच्या औचित्य साधून मदन महाराज संस्थान (कडा)येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमादरम्यान आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर बोडखे, राजेश राऊत बबलू सय्यद, मनोज सातपुते, रघुनाथ कर्डीले, ज्येष्ठ पेपर वितरक भिमराव गुरव यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, संतोष दाणी, शिवाजी सुरवसे, ज्ञानदेव थोरवे आदिंची भाषणे झाली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख, जावेद पठाण,कार्याध्यक्ष अक्षय विधाते, संघटक अतुल जवणे, कोषाध्यक्ष आण्णासाहेब साबळे,गहिनीनाथ पाचबैल, समीर शेख, संतोष नागरगोजे, संतोष तांगडे, किशोर निकाळजे, प्रेम पवळ, दादा पवळ,राजु मस्के, संतोष दाणी,बा म पवार, राजेंद्र लाड, शहानवाज पठाण, संदिप जाधव,सुभाष सोनवणे, परमेश्वर कर्डीले, दिलीप दाणी आदिंसह व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक अक्षय विधाते यांनी केले. सूत्रसंचालन संतोष दाणी यांनी केले. आभार अध्यक्ष अविनाश कदम यांनी मानले

युवा पत्रकार संघाचे उल्लेखनीय कार्य ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केल्याने इतरांसमोर आदर्श – बा म पवार
आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून पत्रकार बांधव हे तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.युवा पत्रकार संघाने जेष्ठ पत्रकार बांधवांचा सन्मान करुन गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने त्यांचा आदर्श नक्कीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार शिक्षक नेते बा म पवार यांनी काढले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!