संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
ग्रामीण क्षेत्रांमध्ये आरोग्य सेविका एक महिला म्हणून कार्य करणे ही एक सोपी गोष्ट नव्हे.प्रा आरोग्य केंद्रात शिपाई पासून ते डॉ .पर्यंत सगळ्यांच्या बहुपात्री भुमिका एकटी पार पाडणारी माझी नर्स . डॉ नाही म्हणून कधी पेशंट परत जावू न देणारी माझी भगिनी. औषधे द्यायल कुणी नाही म्हणून ताटकळत वाट पाहायल न लावत औपधे देऊन समाधानी करणारी माझी नर्स , शिपाई नाही म्हणून ड्रेसिंग करणारी माझी नर्स,डाटा औपरेटर नाही म्हणून न थांबणारी माझी भगिनी शासन ला कुठं ही वेठीस न ठेवणारी माझी नर्स ,लस वाहायला कुणी नाही म्हणून आपल्या उपकेंदातून येऊन स्वता येऊन लस घेऊन जाऊन स्वतःलाच्या जोखीम वर लसीकरण करणारी माझी नर्स ,जी आरोग्याचा आत्मा म्हटले तर वावगं ठरणार नाही .अशा या रणरागिणी ला महिला दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा….
ग्रामीण भाग म्हणजे आजही मोठ्या प्रमाणात पुरुषप्रधान संस्कृतीला मानणारा अशिक्षित पणा मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये चालू आलेल्या परंपरागत रीती रिवाज अशा परिस्थितीला तोंड देत आरोग्य सेविका ग्रामीण भागात सेवा बहाल करत असते. शासन,समाज तसेच अधिकारी वर्गाकडून उपेक्षित असलेले महिलांचे एकमेव केडर म्हणजे आरोग्य सेविका.५००० लोकसंख्येची ग्रामीण डाक्टर जी प्रत्येकाला घरातील हक्काची वाटणारी विश्वसनीय सेवा देणारी . ही शासनाच्या नवनवीन येणाऱ्या योजना, नवनवीन येणारे साथ रोग, नवनवीन येणारे लसी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रामाणिकपणे राबवून फक्त गावातीलच नव्हे तर गाव,तालुका , जिल्हा, राज्य व पर्यायाने देशाचे आरोग्य जिच्या हातात आहे ,जी गावाबाहेर एकांतात, स्मशानभूमीला सोबत स्वतः कधी एकटी तर कधी आपल्या कुटुंबाला घेऊन खेडेगावात राहून सेवा पुरविणारी रणरागिणी ,वीरांगना ,सरकारी औषधी याचे महत्त्व पटवून देण्याची व वरील योजना यशस्वीरित्या पार पडण्याची जबाबदारी पार पाडणारी कोण ??तर ती ग्रामीण नर्स (आरोग्य सेविका )जिला गाव पातळीवर काम करताना कोणत्या ही प्रकारची सुरक्षा नाही कि कोणत्या ही सुख सोयी नाहीत .
शासकीय इमारती त जिथे दवाखाना + निवासस्थान ना पाण्याची सोय ना सुस्थितीतील इमारत .३००ते ४०० स्कवैअर फुटात आपला संसार थाटून लोकांना आरोग्य सेवा देत स्वताला वाहून घेत स्वताचे आरोग्य कधी बिघडते याकडे सुध्दा लक्ष राहात नाही .तरीही एका पद वर सेवेत हजर होऊन ३५/३६ वर्ष सेवा करून ही जवळजवळ ८०% भगिनींना एकाच पदावर सेवानिवृत्त व्हावं लागतंय ,कारण प्रमोशनचा कोठा महिलांच्या वाट्याला कमी .महिला म्हणून किती हा अन्याय ?? आत्ताच उदाहरण घ्या मुंबई( शहरी भाग) येथे गोवरची साथ उद्भवले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्यसेविकेने तांडे वाड्या वस्त्या डोंगराळ दुर्गम भाग येथे सर्वेक्षण करून वंचितांना समुपदेशन करून त्यांचे गोवर रूबेला लसीकरण घडवले. त्याच्याच परिणाम म्हणजे ग्रामीण भागात या साथीची झळ दिसली नाही. यापेक्षाही भयानक जागतिक महामारीमधे आरोग्य सेविकेने ग्रामीण भागात कोरोना काळात यशस्वीरित्या हाताळली. या काळात आरोग्यसेविकेने बाहेरून येणाऱ्या लोकांच्या कॉरंटाईन पासून कोरोना पेशंट ची देखभाल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, कोविड सेंटरला दिवस रात्र ड्युटी स्वतःची व स्वतःच्या परिवाराची जीवाची काळजी न करता पार पाडली. आरोग्य सेविकेने स्वयंप्रेरणेने क्षमतेपेक्षा जास्त एक- एक दिवस कोरोना लसीकरण घडून आणले. करोनाचे प्रतिबंधात्मक लसिकरण १५० कोटी अल्पावधीत पुर्ण करून महामारी आटोक्यात आणण्यासाठी हातभार लावला. लसीकरणाविषयी समुपदेशनाची अतिरिक्त जबाबदारी ही आरोग्यसेविकेने पार पाडले. एके प्रकारे इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये कोरोनाची साथ व हानी प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य सेविकेने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. ग्रामीण च नव्हे तर शहरी भागाही या पदाची गरज लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात हे पदं कार्यरत आहेत. सर्व आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी आरोग्य सेविका पार पाडत असते ग्रामीण भागात स्त्री गरोदर राहिल्यापासून तिच्या तपासण्या ,तिला सेवा देणे, तिची प्रसूती अथवा प्रसुती समुपदेशन करणे, प्रसूती पश्चात सेवा देणे, नवजात बालकाचे लसीकरण, शालेय बालकांचे लसीकरण ही कामे आरोग्य सेविका करीत असते. खेडेगावांमध्ये ऊन ,पाऊस ,वारा ,रस्ता याचा विचार न करता आरोग्यसेविका आपले कार्य तत्पर्तने पार पाडत असते.ग्रामीण भागात कोणत्या ही स्त्रीरोगतज्ञाशिवाय , कोणत्या ही अधिकारी, किंवा कुणाच्या ही मार्गदर्शनाशिवाय वैयक्तिक जोखीम पत्करून मोफत प्रसुती ह्या वर्षभरात शंभरहून अधिक प्रसुती आपल्या कार्यक्षेत्रात करतात ही आकडेवारी शहरी भागातील वाजवी दराने प्रसुती करणाऱ्या रुग्णालयापेक्षा नक्कीच जास्त असू शकते. अशा विविध क्षेत्रात आरोग्य सेविका उल्लेखनीय काम करीत असते.जन्मानंतर आरोग्याची नाळ जी कापते ,जी जपते,जी संगोपन करते तिचेच आज आर्थिक, मानसिक , शारिरीक आरोग्य धोक्यात आले आहे . यांच्या शासनच नाही तर अधिकारी वर्ग ही सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहेत का?? . आजपर्यंत आम्ही कधी शासनकडे ना काही मागितलं ना कधी काम बंद केले ना कधी संप केला हीच आमची चुक आहे का ?? की आम्ही महिला केडर म्हणून
जणू काही पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीने कधीही पुढे जाऊ नये हे शासन धोरण धरले आहे का ? आरोग्य सेविकांना त्यांच्या पदावर तीस- तीस वर्ष सेवा देऊन ही त्यांना पदोन्नतीसाठी वरिष्ठ पद भेटत नाही. 15 -15 वर्ष कंत्राटी पदावर आरोग्य सेविका काम करून त्यांना शासन दरबारी नियमित केले गेले नाही. ज्या काळात स्त्री शिक्षणाचा अभाव होता त्या काळात स्टेपलेडर म्हणून घेण्यात आलेल्या आरोग्य सेविकांचा वापर करून शासन ‘आज गरज सरो वैद्य मरो’ या भूमिकेने शासन त्यांच्याकडून शक्तीने आर्थिक वसुली करीत आहे. अशा प्रकारे आरोग्य सेविकांच्या विविध समस्या मांडत गेले तर प्रत्येक समस्यांचे मोठमोठे प्रबंध तयार होतील.
असो येणाऱ्या काळात ‘आरोग्य सेविका – एक महिला’ यांना योग्य तो न्याय मिळेल अशी मी जागतिक महिला दिनानिमित्त अपेक्षा करते.
श्रीमती वंदना ताई धनवटे
संस्थापिका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण नर्सेस संघटना अहमदनगर