👉माणसांमध्ये सेवाभाव कमी होत आहे, तो वाढला पाहिजे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. बी.जी.शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारी (दि.१६) सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील स्वीट होम, केडगांव बायपास येथे पोलिस-नागरिक स्नेह मेळाव्याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
मेळाव्यात प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, माणसांमध्ये सेवाभाव कमी होत आहे, तो वाढला पाहिजे. म्हणूनच सेवा महत्त्वाची आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या श्री हजारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. बी.जी.शेखर पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर मॅडम आदिंसह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. बी.जी.शेखर पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे काम मोठे कौतुकास्पद आहेत. कोरोनाच्या काळात मोठे काम नगर पोलिसांनी केले आहे.
या पोलीस-नागरिक स्नेह मेळाव्या दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, भूपाली मिसाळ, आर्किटेक अर्शद शेख, दै.लोकमंथन मुख्य संपादक अशोकराव सोनवणे, अहमदनगर लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, दै. समाचार संपादक महेंद्र कुलकर्णी, उद्योजक राजेंद्र कटारिया, नरेंद्र फिरोदिया, आय एमचे अध्यक्ष डाॅ.अनिल आठरे, स्वप्निल मुनोत, कवि सुभाष सोनवणे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
जिल्ह्यातील सामाजिक समस्या सुटण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभेप्रमाणे पोलिसांनी ग्रामीण भागात सभा घ्यावी. यासह पोलिसांनी नागरिकांशी कसा संवाद साधला पाहिजे, यासह वाहतूक समस्या, वाढत्या गुन्हेगारीसह विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे, ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व कोतवाली पोनि संपत शिंदे, तोफखाना पोनि ज्योती गडकरी, भिंगार कॅम्प पोनि शिशिरकुमार देशमुख, नगर तालुका पोनि राजेंद्र सानप, एमआयडीसी पोनि आठरे, वाहतूक शाखेचे पोनि श्री भोसले आदिंसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.