Nagar Reporter
Online news Natwork
नाशिक : – ‘आयजीं’च्या विशेष पथकाने नाशिक हद्दीत तब्बल ३ लाखांचा बेकायदा दारू साठा जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे आयजी डॉ.बी जी शेखर पाटील यांनी अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्याच्या सरहद्दीजवळ नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत विनापरवाना व बेकायदेशीर विदेशी विदेशी दारूचा मोठा साठा ३ लाख ते ३ हजार १९० रुपये किमतीच्या मुद्देमाल छापा टाकून ताब्यात घेतला. देशी-विदेशी दारू गुजरात येथे होत असलेल्या विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर जास्त भावाने गुजरात येथे विक्री करिता जाणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर पाटील साहेब यांना माहिती मिळाली. त्यांनी त्यांच्या विशेष पथकास कारवाईचे आदेश दिले होते.
कारवाई ही विशेष पथकातील पोनि बापू रोहन, एएसआय रवींद्र शिलावट, पोह शकील अहमद शेख, पोना प्रमोद मंडलिक, नारायण लोहारे आदिंची केली आहे.