आमदार संग्रामभैय्या जगतापांच्या पाठपुराव्यामुळे पोलीस हेडकॉटर घरांचा प्रश्न मार्गी लागला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः : पोलीस दल हे समाजातील महत्त्वाचा घटक असून ते रात्रं-दिवस जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतात, त्यांच्या कुटुंबाची राहण्याची सोय व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडकॉटर येथे 640 घरांचा प्रस्ताव 2021-22 च्या आर्थिक वर्षात सादर केला होता, लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करत महायुती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 640 घरांपैकी 320 घरांचे काम सुरू होणार असून याचबरोबर कार्यालयाचे काम देखील सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडकॉटर येथील पोलीस बांधवांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला असून त्याची पाहणी करताना आमदार संग्राम जगताप समवेत शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते,.

अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून नागरिकांच्या संरक्षणाचे काम करत असतात, पोलीस हेडकॉटर येथील घरांना 100 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे पोलीस वसाहती मधील पोलीस बांधव विविध समस्यांना तोंड देत होते. पाणी, रस्ते, ड्रेनेज आदि प्रश्न गंभीर बनले होते. पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला होता त्याचा पाठपुरावा करत मंजूर करून घेत 115 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सहकार्य लाभले आहेत, पोलीस प्रशासनाने देखील पोलीस कर्मचार्‍यांचा कायमस्वरूपी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासात्मक कामाची भूमिका बजावली असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!