आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस वर्किंगच्या सदस्यपदी निवड झाल्याने अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सत्कार

आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस वर्किंगच्या सदस्यपदी निवड झाल्याने अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांना सविधान व संविधान उद्देशिका फ्रेम, शाल, हार, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजीआमदार डॉ सुधीर तांबे , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे,आंबेडकरी चळवळीचे विनोद गायकवाड, कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,शिवसेनेचे सचिन साळवे, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे, शेवगाव तालुका अध्यक्ष कचरू अंकल मगर,शेवगाव शहराध्यक्ष नंदकुमार मोहिते, राहाता तालुका अध्यक्ष साहिल म्हस्के,ॲड. प्रकाश संसारे,कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे, जिल्हा उपाध्यक्ष सोपान धेनक, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शिंदे, मारुतीराव सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल वाघमारे,जिल्हा सरचिटणीस सुरज म्हकाळे,परिवहन काँग्रेसचे संदीप मोटे आधी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी विजय शेळके यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच भाजपचे नितीन साळवे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी थोरात साहेब यांनी मार्गदर्शन करताना संविधान वाचवणं ही आपल्या काँग्रेसची विचारधारा असून.राहुल गांधी यांच्या आरक्षण या संदर्भातल्या विधानाचा विपर्यास भाजपने केला.
अनुसूचित जाती विभाग सक्षम असून आमचे अनुसूचित जाती विभागचे प्रदेश अध्यक्ष असलेले सिद्धार्थ हत्तीअंबिरे राज्यामध्ये चांगलं काम करत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेळके यांनी केले तर आभार. रामनाथ गायकवाड यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!