आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी (ब्रँड अँबेसेडर) नियुक्ती

आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी (ब्रँड अँबेसेडर) नियुक्ती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव – आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी (ब्रँड अँबेसेडर) नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ होऊन स्वच्छतेबाबत जनसहभागातून व्यापक चळवळ उभारली जावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासनाद्वारे पृथ्वी, जल, तेज, वायू आकाश पर आधारीत पर्यावरण संरक्षण करीता माझी वसुंधरा अभियान ४.० ची सुरुवात केली असून या मोहिमेच्या जनजागृती करिता गेल्या २५५ हुन अधिक आठवडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची अविरत पणे सेवा स्वच्छता करत असलेले आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० या अभियान करीता स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणजेच ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नगरपारिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नियुक्ती करण्यात आलेल्या सहीचे नियुक्ती पत्र कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, नगरपरिषदेचे संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे, शहर समन्वयक गायत्री शहाणे यांच्या हस्ते ढाकणे यांना देण्यात आले .


आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरिषद शहरात स्वच्छतेची कामे उत्कृष्टरित्या सांभाळलेली आहेत तसेच सेवाभावी संस्था व शहरात केलेली कामे वाखाण्याजोगे केली असून त्यांचा या कार्याची व्याप्ती पाहता स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत शहरातील नागरीकांमध्ये व्यक्तिगत, स्वच्छता नदी, स्वच्छता श्रमदान कचरा विलगीकरण घरोघरी ओल्या कचन्यापासून कंपोस्ट खत बनविणे, वृक्ष लागवड व संगोपन, नविकरणीय उर्जा स्रोतांचा वापर करणे पाण्याची बचत पर्यावरण संरक्षण व संवर्धन आदी बाबत जनजागृती करणेकामी कोपरगाव नगरपरिषद मार्फत ढाकणे यांची स्वच्छता व पर्यावरण दुत म्हणजेच ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले असून ढाकणे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!