सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : मागील ३ वर्षांत जे आघाडीचे सरकार होते, ते केवळ ठेकेदारीची काम करत होते. आधिका-यांच्या दालनात वाळू माफीया, नंबर दोनचे काम करणारे दलाल हेच असायचे आणि आमचा सर्वसामान्य नागरिक मात्र हा तासनतास वाट बघत बाहेर थांबायचा. आता हे सगळं बंद केले असून सर्वसामान्याचे हे सरकार आहे. त्यामुळे त्याच्या कामासाठी ना दलालाची गरज, ना चकरा मारण्याची गरज, सरकार आता तुमच्या दारात येऊन तुम्हाला लागणारे सर्व आवश्यक ते कागदपत्रे तुम्हाला घरपोहोच देणार आहोत,असे खा.डाॅ.सुजय विखे पा. यांनी सांगितले
पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथे आयोजित जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.मोनिका राजळे या होत्या.
खा.श्री विखे पा. म्हणाले की, आताचे शिंदे-फडणवीस सरकार आणि या सरकारमधील नंबर दोन असे महत्वाचे खाते असलेले आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. हे गोरगरीबासाठीच काम करत आहेत. याचा आपल्या जिल्ह्यासाठी विशेष लाभ होणार आहे. जिल्ह्यात जे काही रखडलेले प्रकल्प तसेच विकास कामे आहेत.ते पुढील वर्षांत पूर्ण करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच खा.विखे पुढे म्हणाले, जिल्ह्यात आम्ही सर्व एक आहोत , आमच्यात जमत नाही असा अपप्रचार विरोधक करत आहेत मात्र खरी गोष्ट ही वेगळीच आहे, जिल्हा बँक अध्यक्षाच्या निवडणुकीत हे आम्ही सिध्द करून दाखवले आहे. आमचे केवळ चार संचालक असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे अध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले.आता तुम्हीच सांगा कोणा कोणाचे कोणा कोणा बरोबर जुळते, आम्ही भाजप एकसंघ आहोत.आणि आम्हा सर्वांचे एकच ध्येय आहे. ते म्हणजे आपला विकास, या साठी आपल्या सर्वांच्या खंबीर साथीची गरज आहे, आपण आमच्या पाठीशी असेच रहा हा विश्वास आम्हाला आहे.
यावेळी ज्येष्ठनेते अर्जुन शिरसाठ, अशोक चोरमुले, युवानेते तथा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे पा, भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, कशिताई गोल्हार, राहुल राजळे, राहुल करखिले, प्रतीक खेडकर, बंडू बोरुडे, बबन सबलस, मंगल कोकाटे, भिमराव फुंदे, भगवान साठे, विष्णूपंत अकोलकर, गोकुळ दौंड, सचिन वायकर, सुनील ओहळ , बाबा राजगुरु, अशोक गाडे, मिठूभाऊ चितळे, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.