संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : Ahemnagar news एप्रिल व मे २०२३ मध्ये अवैध वाळू उपसा, वाहतूक, चोरी करणा-या ६१ वाळूतस्करावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान २ कोटी ८१ लाख ५३ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबीने केली आहे. Nagar Live
एसपी राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, वाहतूक व चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना अवैध वाळू उपसा, वाहतूक, चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन वाळू चोरी कमी होण्याच्या दृष्टीने वाळू तस्करी करणा-यांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अहमदनगर एलसीबी’ने व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी एप्रिल व मे २०२३ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक, चोरी व तस्करांविरुध्द ३१ केसेस दाखल करुन ६१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाई दरम्यान २ कोटी ८१ लाख ५३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एसपी राकेश ओला यांनी यापुढे देखील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा, वाहतूक, चोरी व तस्करांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करुन महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्ये विषयक व धोकादायक व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालणे (MPDA) कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी आरोपींचे अभिलेख पडताळणी करुन आरोपींविरुध्द (MPDA) प्रस्ताव तयार करुन स्थानबध्द करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.