संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आष्टी : तालुक्यातील महिंदा येथील मूळचे रहिवासी व संभाजीनगर पोलीस दलात कार्यरत असलेले आजिनाथ निवृत्ती शेकडे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या इक्विपमेंट राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 93 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांनी एकूण 645 किलोग्रॅम वजन उचलले. या यशामुळे त्यांची जुलै महिन्यात आगरताळा त्रिपुडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल त्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डीचे अध्यक्ष अभय आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डीचे प्राचार्य डॉ.जी पी ढाकणे, मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ.सुभाष शेकडे आदींनी अभिनंदन केले आहे.