👉अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे निवेदनला आले यश…..
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भिंगार मंडळाधिकारी व तलाठी कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे अनेक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. हा मनमानी कारभार बंद करून नागरिकांना वेळेत महसूल नियमानुसार कागदपत्रे व महसूल कामे विशिष्ट वेळेत द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने दिला होता. यांची महसूल यंत्रणेने दखल घेऊन भिंगार-नागरदेवळे मंडळाधिकारी,तलाठी कार्यालयात कामकाजाच्या माहितीचा फलक लावण्यात आला आहे.
भिंगार-नागरदेवळे मंडळाधिकारी,तलाठी कार्यालयात प्रशासकीय दस्तावेज काढणे, अथवा सात-बारा उता-यावर नोंद लावणे, यासह अन्य विशिष्ट कामाला नागरिकांना अवास्तव मानसिक त्रास दिला जातो, कामांसाठी अवास्तव मागणी करण्यात येत, या नागरिकांच्या पिळवणुकी संदर्भात अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले, यानंतर नागरिकांना कामकाज करताना ञास झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनि खरारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांने दिला होता.
याची तातडीने दखल घेत भिंगार मंडळधिकारी, तलाठी कार्यालयात शासन मान्यता प्राप्त दरपत्रक लावण्यात आले आहे.
यावेळी शिष्टमंडळात भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सनि खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन ,शिव राष्ट्रसेना भिंगार उपाध्यक्ष कुणाल बैद, पञकार प्रशांत पाटोळे, प्रविण बगंन ,विकी चावरे,धिरज बैद आदीसह नागरिक सहभागी झाले होते.