👉बीड व अहमदनगर येथे केलेल्या भ्रष्टाचाराचा लवकरच होणार पर्दाफाश

Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक रा.ल.चारठाणकर यांनी बीड नगररचना कार्यालयात आणि अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी केलेल्या कामांच्या झालेल्या तक्रारीनिहाय चौकशी करावी. त्यात तथ्य आढळून गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट राज्याचे नगररचना विभागाचे संचालक वि.दु.तळपे यांनी आदेश काढले आहेत.

नगररचना विभागात आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोट्यावधीची माया जमविणारे अहमदनगर महानगरपालिक नगररचना विभागाचे सह संचालक र.ल.चारठाणकर यांच्या विरोधात पुणे नगररचन विभागाच्या संचालक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहायक संचालक श्री चारठाणकर यांची दोन विभागनिहाय चौकशी होत आहे. बीड येथे नगररचन विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत असतांना श्री चारठाणकर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्याप्रमाणे सध्या ते अहमदनगर महानगरपालिका नगररचना विभागाचे ते सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. याठिकाणी ही श्री चारठाणकर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. याबाबत राज्याचे आयुक्त तथा संचालक पुणे यांच्याकडे पुराव्यासहीत आसेफ खान हमीद खान यांनी तक्रारारी केल्या होत्या. त्या तक्रारीमध्ये सहायक संचालक श्री. चारठाणकर यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात यावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्याचे संचालक नगररचन विभाग, पुणे यांनी दि.२७ मार्च २०२३ छत्रपती संभाजीनगर नगररचना विभागाचे सहसंचालक यांना श्री चारठाणकर यांच्या कार्यकाळातील केलेल्या तक्रारींची मुद्दे निहाय चौकशी करून तात्काळ आहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष: बाब म्हणजे या अंनुषंगाने शासनस्तरावर कारवाई सुरू आहे. या कारवाईत सहायक संचालक श्री चारठाणकर यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे राज्यासह अहमदनगर महानगरपालिकेचे लक्ष लागले आहे.
