अ.नगर पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्या : कोतवाली पोनि प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्यात पोनि आनंद कोकरे

अ.नगर पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्या : कोतवाली पोनि प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्यात पोनि आनंद कोकरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये नव्याने अहमदनगर शहरातील अतिसंवेदनशील पोलिस ठाणे कोतवाली पोलिस ठाण्यात पोनि प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्यात पोनि आनंद कोकरे यांच्या नियुक्ती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या आहेत. 

आर्थिक गुन्ह शाखेत पोनि संभाजी गायकवाड, सायबर पोलीस ठाण्यात सपोनि युवराज आठरे, जिल्हा विशेष शाखेत पोनि विजय करे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सपोनि योगेश राजगुरू आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात सपोनि माणिक चौधरी यासह अन्य पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या आहेत.

नव्याने नियुक्त करण्यात आलेले पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक याप्रमाणे – सुपा पोलिस ठाण्यात पोनि अरुण आव्हाड, राहुरी पोलिस ठाण्यात पोनि संजय ठेंगे, आश्वी पोलिस ठाण्यात पोनि संजय सोनवणे, शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात अशोक भवड, बेलवंडी पोलिस ठाण्यात पोनि संतोष भंडारे, अकोले पोलिस ठाण्यात पोनि गुलाबराव पाटील, अहमदनगर वाचक कार्यालयात पोनि नितीशकुमार चव्हाण, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोनि नितीन देशमुख, अहमदनगर मानवसंसधान विभागात पोनि सतिष घोटेकर, सोनई पोलिस ठाण्यात सपोनि आशिष शेळके, लोणी पोलिस ठाण्यात सपोनि कैलास वाघ, राजुर पोलिस ठाण्यात सपोनि दिपक सरोदे तर
बदली आदेशाधीन पारनेर पोलिस ठाण्यात पोनि समीर बारावकर, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोनि संदीप कोळी, शिर्डी पोलिस ठाण्यात पोनि रामकृष्ण कुंभार, नियंत्रण कक्षे पोनि ज्योती गडकरी यांच्या नियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांनी केल्या आहेत.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!