अ.नगर ते मनमाड रस्त्यावरील पुणतांबा फाटा ते विळद बायपास पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर: अहमदनगर ते मनमाड रस्त्यावरील पुणतांबा फाटा ते विळद बायपास पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी, यांची नोंद घेऊन त्या बदलण्यात आलेल्याच मार्गाचाच रहदारीसाठी वाहनधारकांनी करावा, असे आवाहन एसपी राकेश ओला यांनी केले आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारत सरकार यांचे अधिपत्याखाली अहमदनगर मनमाड या महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेले असुन ते सध्या प्रगतीपथावर आहे. मार्गावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असल्यामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये मोठया प्रमाणात व्यत्यय येऊन वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे. सध्या पावासाळा सुरु असून दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरुन अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे. तसेच महामार्गावर शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर असून देशभरातून भाविक शिर्डी येथे येत असतात. दुरुस्तीचे कामादरम्यान अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये, या करीता दि.८ सप्टेंबर २०२४ रोजीचे ८ वा. ते दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजीचे १० वाजेपर्यंत अहमदनगर- मनमाड या महामार्गावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटा पर्यंतच्या अवजड वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे नियोजित आहे. ते असे…
📥१) अहमदनगर-पुणे- सोलापुरकडून मनमाडकडे जाणारे सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीकरीता मार्ग 👉👉👉 i) कल्याण बायपास चौक अहमदनगर कल्याण महामार्गावरुन आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिक कडे किंवा
ii) विळद घाट – दूध डेअरी चौक शेंडी बायपास अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरुन कायगाव गंगापुर – वैजापुर – येवला मार्गे इच्छित स्थळी जातील.
📥२) शनिशिंगणापुर-सोनई रोडवरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील.
📥३) मनमाड – येवला – शिर्डीकडून अहमदनगर मार्गे पुणे- मुंबई कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरीता मार्ग पुणतांबा फाटा झगडे फाटा (रा.म.माक्र.१६० ब) झगडे फाटा सिन्नर (रा.म.मा.क्र. १६०) सिन्नर नांदुर शिंगोटे- संगमनेर – आळेफाटा (रा.म.मा.क्र.६०) मार्ग
📥४) मनमाड – येवलाकडून अहमदनगर-सोलापूर-बीड कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरीता मार्ग पुणतांबा फाटा येथून वैजापूर- गंगापूर – कायगाव – प्रवरासंगम – शेंडी बायपास – विळदघाट – केडगाव बायपास मार्गे
📥५) लोणी-बाभळेश्वर-श्रीरामपूरकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर-श्रीरामपूर – – टाकळीभान- नेवासामार्गे -अहमदनगर
या नियोजित मार्गांचा वापर करून दिलेल्या आदेशचे पालन करुन नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावेत, असे एसपी श्री ओला यांनी म्हटले आहे.