संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, कार्यालयाकडून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्यास राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यामध्ये निवड झाली आहे.
पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करुन देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध व गुन्ह्यांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करणे हा हेतू साध्य करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोकृष्ट ५ पोलीस ठाण्यांची निवड होते. त्या पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाते.
त्या अनुषंगाने राज्यपातळीवर सर्वोकृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करुन दिलेले गुणांकन, निकष, मूल्यमापन व नियमावली ई बाबींचा बारकाईने विचार करुन पोलीस ठाण्याचे निवड केली जाते.
सर्वोकृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्त व परिक्षेत्र निहाय समित्या गठीत करुन गुणांकन, निकष, मुल्यमापन व नियमावली ई बाबींचा काटेकोर व बारकाईन पालन करणारे पोलीस ठाणे म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्याची राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे.
राजूर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे हा मान मिळणे करीता जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. दिपाली काळे मॅडम, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, राजूर पोलीस ठाण्याचे तात्कालीन प्रभारी अधिकारी सपोनि नितीन पाटील व प्रभारी अधिकारी, राजूर पोलीस ठाण्याचे सपोनि नरेंद्र सावळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.