संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई सिगारेट व हुक्का पार्लर या दोन ठिकाणांवर छापा टाकण्यात आले. या छाप्यात पाचजणांविरुद कारवाई करण्यात आली असून, यात ४२ हजार ६१० रु. किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, विशाल गवांदे, सचिन आडबल, पोकॉ रणजीत जाधव व मपोकॉ सारीका दरेकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

माहितीनुसार एलसीबी टिम’ने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करुन प्रोफेसन चौकातील पान फंडा येथुन एका इसम शासनाने बंदी घातलेली ई सिगारेट, हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखूजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने विक्री करताना मिळून आले. त्यास २२ हजार ३८० रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच पथकाने सर्जेपुरायेथील इंगळे आर्केड येथील तळघराजवळ जाऊन खात्री करता काहीजण हुक्का पिताना व एकजण हुक्कापिण्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने पुरविताना मिळून आल्याने अचानक छापा टाकण्यात आला. यात २० हजार २३० रुपये किंमतीचे मुद्देमाल असा एकुण ४२ हजार ६१० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी नांव जप्त मुद्येमाल याप्रमाणे तोफखाना 704/23 भादविक 188, 272, 273 सह सिगारेट व तंबाखु उत्पादने अधिनियम कलम 4 व 21 (1) 1) चेतन बाबासाहेब खर्डे, वय 31, रा. प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर 22,380/- ग्रेप्स, अरेबियन, स्ट्रॉबेरी आईस, लश आईस, पॅशन फ्रुट, हुक्का फ्लेवर व इलेक्ट्रीक सिगारेट, तोफखाना 711/23 भादविक 285, 334, 188, 272, 273 सह सिगारेट व तंबाखु उत्पादने अधिनियम कलम 4 व 21 (1) 1) प्रशांत गजानन सोनवणे वय 32, रा. केडगांव, अहमदनगर, जुबेर फिरोज सय्यद वय 19, रा. बोल्हेगांव, ता. नगर, तेजस मिलिंद भिंगारदिवे वय 20, रा. आर्यन कॉलनी, बोल्हेगांव, ता. नगर, कृष्णा अशोक इंगळे रा. सर्जेपुरा, अहमदनगर (फरार) 20,230/- काचेचे व स्टीलचे पॉट, रबरी पाईप, विविध प्रकारचे फ्लेवर, प्लॅस्टीक फिल्टर, मातीची चिलम, लोखंडी चिमटा, फॉईल पेपर व कोळसा, एकूण ५ आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४२ हजार ६१० रुपये किंमतीचा ग्रेप्स, अरेबियन, स्ट्रॉबेरी आईस, लश आईस, पॅशन फ्रुट, हुक्का फ्लेवर व इलेक्ट्रीक सिगारेट काचेचे व स्टीलचे पॉट, रबरी पाईप, विविध प्रकारचे फ्लेवर, प्लॅस्टीक फिल्टर, मातीची चिलम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.