संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : शेवगांव तालुक्यातील वाडगव्हाण शिवारामध्ये गांजा शेतीवर छापा टाकला. या छाप्यात २ लाख ५० हजार ५०० रु. किं.ची ३३५ लहान मोठी गांजाची झाडे जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व श्रीरामपूर व प्र.शेवगाव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव, सफौ विष्णु घोडेचोर, पोहेकॉ देवेंद्र शेलार, पोना संतोष लोढे, पोकाॅ शिवाजी ढाकणे, मपोना भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ बबन बेरड तसेच पोना रविंद्र कर्डीले व पोकॉ किशोर शिरसाठ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने शेवगांव येथे जाऊन स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेऊन वाडगव्हाण ( ता. शेवगांव) येथील अशोक काजळे याचे शेतात जाऊन पाहाणी करुन मिळालेल्या माहितीची खात्री केली असता मक्याचे शेतामध्ये गांजाची झाडे दिसून आल्या. या ठिकाणी छापा टाकून अशोक सुदाम काजळे (रा. वाडगव्हाण, ता. शेवगांव) याच्या शेतामधून २, लाख ५० हजार ५०० रुपये किंमतीच्या गांजाची ३३५ लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आली. या एलसीबीचे पोना संतोष शंकर लोढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गुरनं. ४०५/२०२३ एन. डी. पी. एस. कायदा कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई शेवगांव पोलीस करीत आहे.