संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नेवासे : तालूक्यातील शहापुर व देवगांव शिवारामध्ये बेकायदेशीर गांजा व अफुचे शेतीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात १४ लाख ९५ हजार ४२० रु. किं.ची ६२४ लहान मोठी गांजा व अफुचीची झाडे जप्त करुन मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एलसीबी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व श्रीरामपूर व अतिरिक्त प्रभारी शेवगांव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि गणेश वारुळे, सफौ विष्णु घोडेचोर, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, संदीप दरदंले, पोकॉ शिवाजी ढाकणे, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकॉ ज्योती शिंदे व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शहापूर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्याच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजा व अफूचे झाडांची लागवड केलेली आहे, ही माहिती मिळाल्याने ती माहिती एसपी राकेश ओला यांना सांगितली. एसपी ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी टिम’ने नेवासा येथे जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री करुन, स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेऊन प्रथम शहापुर (ता. नेवासा) येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांच्या शेतात पाहाणी केली. यावेळी गव्हाचे शेतामध्ये २.५ फुट उंचीची दोन व घरासमोर ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरासमोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढून तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्याने छापा टाकला. या छाप्यात बाबुराव लक्ष्मण साळवे याच्या कब्जातील शेतामधून १ लाख ११ हजार ४२० रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.
तसेच देवगांव (ता. नेवासा) येथे जाऊन रावसाहेब भागुजी गिलगिले यांच्या शेताची पाहणी केली.या दरम्यान शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आल्या. छापा टाकून रावसाहेब भागुजी गिलबिले (वय ३८, रा. देवगांव, ता. नेवासा) याच्या कब्जातील शेतामधून १३ लाख ८४ हजार रु. किंमतीची ६८.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.
या प्रमाणे नेवासे तालुक्यातील शहापूर येथे कारवाई करुन १ लाख ११ हजार ४२० रु. किंमतीची ३ गांजाची लहान मोठी हिरवी झाडे व देवगांव येथे कारवाई करुन १३ लाख ८४ हजार
रु. किंमतीची ६९.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे असा एकूण १४ लाख ९५ हजार ४२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. एलसीबीचे पोना संदीप संजय दरदंले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०९/२०२३ एन. डी. पी. एस. कायदा कलम ८ (क), १५, १८, २० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.