संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार येथील सौरभनगर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुस अवैधरित्या जवळ बाळगणा-यास पकडले. त्याच्याकडून ६० हजार ४०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, सफौ भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना विजय ठोंबरे, सचिन आडबल, दिपक शिंदे, पोकॉ मेघराज कोल्हे, चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर व अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.