संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : Ahemnagar LCB नव्याने हजर झाल्यानंतर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी अवैध धंद्यांवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर शहर व उपनगरात दोन जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापा टाकला. Cirme News या छाप्यात जुगार खेळणा-या ४७ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम, ९ दुचाकी, एक स्विफ्ट कार व ३५ मोबाईल फोन असा एकूण १३ लाख १९ हजार ६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत धडाकेबाज कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पपोउअ शिरीष वमने, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, शरद बुधवंत, पोना विशाल गवांदे, विशाल दळवी, पोकाॅ विजय धनेधर यांच्या टिमसह तोफखाना परिसरातील जंगुभाई तालम तसेच पपोउअ अरुण पाटील, सफौ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ फकिर शेख, पोना विजय ठोंबरे, लक्ष्मण खोकले, पोकॉ रोहित मिसाळ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
एसपी राकेश ओला यांना माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील तोफखाना येथील जंगुभाई तालमीजवळ दोन शेजारी-शेजारी असलेल्या पत्र्याचे शेडचे आडोशाला तसेच जुना पिंपळगांव रोड, सिटी प्राईड हॉटेलजवळ, सावेडी येथे पत्र्याचे शेडमध्ये उघड्यावर काही २५ ते ३० लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने, अरुण पाटील व एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना कळवून पुढील कार्यवाहीबाबत आदेश दिले.
आदेशान्वये पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला जुना पिंपळगांव रोड, सिटी प्राईड हॉटेल जवळ, सावेडी येथे जाऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन टिम रवाना केली.एलसीबी टिम’ने मिळालेल्या माहिती ठिकाणी जंगुभाई तालीम तोफखाना येथे पंचासह जाऊन खात्री केली असता काहीजण दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन तिरट जुगार खेळतांना दिसल्याने अचानक छापा टाकून जुगार खेळत असलेल्यांना ताब्यात घेतले. पोलीस टिम व पंचाची ओळख सांगुन त्यांना त्यांची नाव व पत्ते विचारले असता तूषार विलास तोडमल (वय २९, रा. वाघगल्ली नालेगांव, अहमदनगर), अभिजीत हर्षकांत सासोडकर (वय ३५, हरा. विठ्ठल मंदीरामागे, तोफखाना, अहमदनगर), प्रशांत वसंत देठे (वय ३७ रा. सूर्यानगर सावेडी, अहमदनगर), अंबादास दत्तात्रय यणगूल ( वय ५२, रा. शमीगणपती मागे, दिल्लीगेट, अहमदनगर), धनेश किशोर धनवटे (वय २९, रा. वाघगल्ली नालेगांव, अहमदनगर) विलास प्रद्माकर वराळे (वय ४५ रा. सादीकमळा, भिंगार, अहमदनगर), लक्ष्मण अर्जून सारसर (वय ४१, मून्सीपल कॉलनी, नालेगांव, अहमदनगर), गोरक्ष शिवनाथ बडे (वय ३२, रा. आलमगीर माधवबांग, भिंगार, अहमदनगर), निलेश वसंत येनगंधुल (वय २७, रा. दातरंगेमळा नालेगांव, अहमदनगर), निर्मलदास देवराम कांबळे (वय ४२, रा. दातरंगेमळा नालेगांव, अहमदनगर), पवन दिपक पवार (वय ३२, रा. दातरंगेमळा नालेगांव, अहमदनगर), संजय गंगाराम हंकारे (वय ५९, रा. काळू बागवानगल्ली पारशाखूंट, अहमदनगर), पोपट मधुकर पवार (वय ५३, रा. साकत, अहमदनगर), निकेश देवराम कांबळे (वय ४३, रा. आरणगांव, अहमदनगर), मोबीन आलमगीर शेख (वय ३७, रा. सारोळा स्टेशन, ता. नगर), निलेश शशीकांत गिरी (वय ३९, रा. भूतकरवाडी, अहमदनगर), संभाजी रामदस लोटके (वय ४४, रा. खंडाळा, ता.नगर), काळू मारूती शिंदे (वय ४७ रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर), अनिल भाउसाहेब खैरे (वय २९, रा. पाईपलाईनरोड, भिस्तबाग चौक, अहमदनगर), अरूण बाबुराव भिंगारदिवे (वय ५८, रा. सावेडी, अहमदनगर), साहेबराव रामचंद्र शिंदे, (वय ५१ रा. वाघुंडे, ता. पारनेर), अंबादास सूदर्शन चेन्नूर (वय ४८, रा. दातरंगेमळा नालेगांव, अहमदनगर), अनिल देवीदास सैंदर (वय ४५ रा. चितळे रोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. आरोपी नन्तु ऊर्फ ज्ञानेश्वर दौंडकर (रा. अहमदनगर (फरार) हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.
दरम्यान या सर्वांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जामध्ये १ लाख ४० हजार १०० रुपये किंमतीची रोख, ५० हजार रु. किंमतीची एक दुचाकी, २ लाख रु. किंमतीची एक स्विफ्ट कार, १ लाख ६२ हजार रु. किंमतीचे विविध कंपनीचे १६ मोबाईल फोन व तिरट जुगाराची साधने असा एकूण ५ लाख ५२ हजार १०० रु. किं.चा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करुन सर्व २४ आरोपीविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ॥ ३९५ / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉२३ आरोपीविरुध्द जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल
तसेच जुना पिंपळगांव रोड, सिटी प्राईड हॉटेल जवळ, अहमदनगर येथे पथकाने पंचासह जाऊन खात्री केली असता, पत्र्याचे शेडमध्ये उघड्यावर गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन तिरट जुगार खेळतांना दिसल्याने अचानक छापा टाकून जुगार खेळत असलेल्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना त्यांची नाव व पत्ते विचारले असता सुरज मच्छिंद्र शिंदे (वय २९, रा. वैदुवाडी, अहमदनगर), संदीप दामोदर गोरे (वय ३६, रा. नागापुर, अहमनगर), भरत पुंडलीक ठाकरे (वय ३७, रा. वैशाखरे, ता. मुरबाड, जि. ठाणे), संतोष सोमनाथ शिंदे (वय २३, रा. लोणी, ता. राहाता, जि अ.नगर), राजु बाबु शिंदे (वय ४३, रा. वैदुवाडी, अहमदनगर), विकास नारायण बोठे (वय ३७, रा. भिस्तबाग, अहमदनगर), धिरज दिलीप निक्रड (वय २८, रा. नागापुर, अहमदनगर),: बु-हा हकीम खान (वय ३२, रा. मथुरा), संदीप मोहन तारु (वय ३९, रा. पदमानगर, अहमदनगर), गोविंद राम इंगळे (वय ३६, रा. पाईपलाईन रोड, निर्मल नगर, अहमदनगर), दत्तात्रय देवराम शेळके (वय ४५, रा. धानोरा, आष्टी, जि. बीड), रविंद्र तुकाराम डोंगरे (वय ३८, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर), महेंद्र शिवराम कदम (वय ४७, रा. एमआयडीसी, अहमदनगर), विठ्ठल नवनाथ कुटे (वय ४९, रा. भिस्तबाग चौक, अहमदनगर ), बाबासाहेब कारभारी जपकर (वय ३३, रा. भिस्तबाग, अहमदनगर), बाळासाहेब महादेव तांबडे (वय ६३, रा. व्दारकाधिश कॉलनी, भिंगार), अजिज गुलाब शेख (वय ५३, रा. गजानन कॉलनी, वडगांवगुप्ता, ता. नगर), इम्रान इलियास शेख (वय ३६, रा. नगरवेस, वांबोरी, ता. राहुरी), मुनावर सलीम शेख (वय ३०, रा. आंबेडकर चौक, वांबोरी, ता. राहुरी), सुशांत संजय फुंदे (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, तपोवन रोड, अहमदनगर), सिराज जानमोहम्मद खान ( वय ३५, मुळ रा. इगलास, जि. अलिगड, राज्य उत्तरप्रदेश हल्ली रा. सिटीप्राईड हॉटेल जवळ, जुना पिंपळगांव रोड, अहमदनगर), राजू खॉ अज्जोदीन खाँ (वय ४०, मुळ रा. इगलास, जि. अलिगड, राज्य उत्तरप्रदेश हल्ली रा. सिटीप्राईड हॉटेल जवळ, जुना पिंपळगांव रोड, अहमदनगर), मनिष नवीनचंद सहाणी (वय ४७, रा. भिस्तबाग अहमदनगर), असे असल्याचे सांगितले.
या सर्व जुगा-यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जामध्ये १ लाख ७६ हजार ९६० रुपये किंमतीची रोख, २ लाख ८० हजार रु. किंमतीच्या ८ दुचाकी, ३ लाख २० हजार रु. किंमतीचे विविध कंपनीचे १९ मोबाईल फोन व तिरट जुगाराची साधने असा एकूण ७ लाख ५८ हजार ९६० रु. किं. चा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करुन २३ आरोपीविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ॥ ३९६/ २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे.