संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : तालुक्यातील आखातवाडे गावाच्या शिवारात ढोरा नदीपात्रात पोलिसांनी छापा टाकला असता, बेकायदेशीर वाळू उपसा करताना दोघांना पकडले. या छाप्यात एक टेम्पो व २० ब्रास वाळू असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
चालक संदिप रमेश वाघमारे (वय २५ रा. देवटाकळी ता. शेवगाव, जि. अ.नगर), पप्पू कचरू तूजारे (वेय-३० रा. हिंगणगांव ता. शेवगांव जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शेवगाव डिवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोहेकाॅ.दत्तात्रय गव्हाणे, पोकाॅ सागर ससाणे, पोकाॅ जालिंदर माने, पोकाॅ शिवाजी ढाकणे, पोना रामेश्वर घुगे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

शेवगाव तालुक्यात एलसीबी टिम’ पेट्रोलिंग करत असतांना एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली. ती माहिती एलसीबी टिम’ला देऊन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबी टिम’ने गुरुवारी दि.४ मे आखातवाडे गावाच्या शिवारात (ता. शेवगांव जि.अहमदनगर) येथे ढोरा नदीपात्रात छापा मारला. या दरम्यान एक विना नंबरचा पिवळ्या रंगाचा टेम्पोमधून चालक संदिप रमेश वाघमारे (वय २५ रा. देवटाकळी ता. शेवगाव, जि. अ.नगर), पप्पू कचरू तूजारे (वय ३० रा. हिंगणगांव ता. शेवगांव जि. अहमदनगर) ही दोघे व मालक मधुकर उर्फ भाऊ पोपट वाघमारे (रा. देवटाकळी ता शेवगाव जि. अ.नगर (फरार) यांच्या स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता बेकायदेशिरपणे शासकीय वाळू उपसा करूत चोरुन वाहतूक करतांना मिळून आले. याबाबत एलसीबी पोना शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात भादवि कलम ३७९,३४ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलिस करीत आहे.