संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शेवगांव येथील अवैध वाळू वाहतुकीविरुध्द धडक कारवाईची पोलिसांनी मोहिम राबविली आहे. या कारवाईत १० लाख ८० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व श्रीरामपूर व अति. प्रभार शेवगांव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोना सचिन आडबल, विशाल गवांदे, पोकॉ शिवाजी ढाकणे, आकाश काळे व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन-उपसा व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये एलसीबी टिम’ने शेवगांव तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याकरीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, अशोक शिंगडे हा शेवगांव तालुक्यातील हातगांव ते मुंगी जाणारे रोडने, पांढ-या रंगाचे ढंपरमधुन अवैध वाळू वाहतूक करीत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी ती माहिती एलसीबी टिम’ला सांगून पंचांनासोबत घेऊन खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सुचने प्रमाणे एलसीबी टिम’ने पंचांसह हातगांव ते मुंगी (ता. शेवगांव) रोडने जाऊन सापळा लावून थांबलेले असतांना एक पांढरे रंगाचा ढंपर येताना दिसला पथकाची खात्री होताच चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करता चालकाने वाहन थांबविले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळू असल्याची खात्री झाल्याने चालकास वाळू वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस केली्. यावेळी त्याने त्याच्याकडे शासनाचा वाळू उत्खनन-उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले. त्यामुळे एलसीबी टिम’ने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे महेश बंडु खरात (वय २५), व अशोक आण्णासाहेब शिंगडे (वय ४३, दोन्ही रा. मुंगी, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकीची वाळू अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने आरोपींना १० लाख ८० हजार रु. किंमतीचा पांढरे रंगाचा ढंपर व चार ब्रास वाळुसह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१९/२०२३ भादविक ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहे.