संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कर्जत : Ahemnagar LCB poilce तालुक्यातील राक्षसवाडी शिवार येथील राक्षसवाडी तळ्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातील धडक कारवाईत दोन जेसीबी, दोन टेम्पो व एक ब्रास वाळू असा ५० लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. Crime News
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व कर्जत डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ संभाजी कोतकर, पोना सचिन आडबल, पोकॉ रोहित मिसाळ, मयुर गायकवाड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याआदेशान्वय अहमदनगर एलसीबी टिम’ने कर्जत तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याकरीता पेट्रोलिंग करत असतांना एलसीबी पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली की, राक्षसवाडी तळे (ता. कर्जत) येथे संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे हा त्यांच्या हस्तकामार्फत जेसीबीचे मदतीने तळ्यातील वाळूचा उपसा करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतूक करत आहे. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
पोनि दिनेश आहेर यांनी माहिती लागलीच टिम’ला कळवून पंचांनासोबत घेऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. सुचना प्रमाणे एलसीबी टिम’ने पंचांसह राक्षसवाडी (ता. कर्जत) येथील राक्षसवाडी तळ्याजवळ जाऊन आडोशाला थांबून खात्री केली असता तळ्यामध्ये दोनजण जेसीबीच्या मदतीने वाळू उपसा करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरतांना दिसले पथक व पंचांची खात्री होताच पथक त्यांच्यावर अचानक छापा टाकून पकडण्याचे तयारीत असताना एका जेसीबी व एका ट्रॅक्टर वरील चालक पोलीसाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. दुसरा जेसीबी, ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस केली. त्यांनी त्यांच्याकडे शासनाचा वाळू उत्खनन-उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितल्याने एलसीबी टिम’ने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सागर राजेश शिंदे (वय २७, रा. वडळी, ता. श्रीगोंदा), शुभम दत्तात्रय अधोरे (वय २४, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) असे सांगितले त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी वाळु उपसा हा संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे (रा. साळनदेवी रोड, ता. श्रीगोंदा) यांच्या सांगण्यावरुन करत असल्याचे सांगितले. अन्य जण व पळून गेलेल्या जेसीबी व ट्रॅक्टर चालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अवैधरित्या कर्जत येथील राक्षसवाडी तळ्यातुन शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकीची वाळू अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने आरोपींना ५० लाख २० हजार रुपये किंमतीचे दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर टॉली व एक ब्रास वाळुसह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९८/२०२३ भादविक ३७९3 सह पर्यावरण कायदा कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहे.