संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आली आहे. या घटनेत एका युवकाचे एका विवाहित महिलेबरोबर चांगलेच सूत जमले. यानंतर त्या युवकाने संबंधित विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवले. पीडित महिलेने अखेर त्याला लग्न कधी करणार ? , असा जाब विचारण्यास सुरुवात केल्यावर त्या युवकाने त्या विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरु केल्याने हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित महिला ही २७ वर्षीय आहे. त्या पीडित महिलेचे पतीबरोबर पटत नसल्याने ती एकटी वेगळी राहत होती. या दरम्यान एकमेकांशी ओळख झाली होती. यानंतर आरोपी याने त्या संबंधित विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तिला दिवस गेल्याने, ती संबंधित विवाहित महिला ही त्या युवकाला लग्नासाठी आग्रह धरु लागली. तो युवक त्या विवाहित महिलेचा रागरागा करु लागल्याने यातून दोघांचे चांगलेच खटके उडण्यास सुरु झाले.
त्या युवकाने त्या विवाहिते महिलेला परत जर लग्नाचा विषय काढशील तर ‘ मी आत्महत्या करीन आणि तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन आणि तुला गुन्ह्यात अडकवील ‘ असे म्हणत शिवीगाळ देखील केली. त्यानंतर महिलेने त्याला लग्नाची विनवणी केली. मात्र त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला म्हणून पीडित महिलेने अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.