👉पालकमंत्र्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.6 मे 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), बुरूडगाव रोड, अहमदनगर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विषयक तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन सत्र होणार आहे. या शिबीरात दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना, करिअर प्रदर्शिनी, भविष्यातील रोजगाराच्या संधी, स्पर्धा परिक्षा इ. बाबत मार्गदर्शन व करिअर संबंधित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात व्यक्तिमत्व विकास, बायोडेटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, NCS पोर्टल व महास्वयंम पोर्टलवरील नोंदणीचे फायदे, उद्योजकता विकास आदी बाबत देखील तज्ज्ञांमार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच विविध समाजघटकांसाठी शासकिय महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या स्वयंरोजगारविषयक योजनांची माहिती सदर शिबीरात देण्यात येईल. सर्व इच्छुक युवक/युवतींनी समुपदेशन सत्रासाठी पूर्व नोंदणी करण्यासाठी https://mahacareer.globalsapio.com या लिंकवर गुगल फॉर्म मध्ये माहिती भरावी व मार्गदर्शन शिबीरास उपस्थित रहावे.
इच्छुक उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिवीरास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थी साठी एकरक्कमी थकीत कर्ज भरून खाते बंद करणा-या लाभार्थीस थकीत व्याजात 50 टक्के सवलतीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजना ठराविक कालावधी म्हणजे दि.30 एप्रिल. २०२४ पर्यत राबविण्यात येणार आहे. थकीत असलेल्या लाभार्थीनी या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून थकीत असलेले कर्ज एकरकमी भरून थकीत व्याजावर 50 टक्के सवलत घेवुन आपले कर्ज खाते बंद करावे. तसेच कर्ज थकबाकीदारांनी आपल्यावर होणा-या कार्यवाही बाबत गांभिर्याने विचार करावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दिनेश चव्हाण यांनी केले आहे.