अ.नगरला सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ३ दिवसीय सायकल पोलो स्पर्धा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: भारतीय लष्कराने सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अहमदगर शहरामध्ये आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ आयोजित करण्याची घोषणा केली. या स्पर्धेमध्ये देशातील सर्वोत्तम सायकल पोलो खेळणारे संघ ही उद्घाटन आवृत्ती जिंकण्यासाठी खेळतील. तसेच ही स्पर्धा सीपीआयएफच्या अधिका-यांना आगामी सायकल पोलो विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी मदत करेल. या स्पर्धेत भारतीय वायुसेनेचे सायकल पोलो संघ, भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स आणि प्रादेशिक सेना एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.


हा कार्यक्रम एसीसीअँडएस (ACC&S) मधील पोलो ताल मैदानावर आयोजित केला जाईल. अहमदनगर येथील एसीसीअँडएस (ACC&S) मधील आर्मी स्पोर्ट्स नोड येथे पत्रकारांना या कार्यक्रमाविषयी कार्यक्रमाचे व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर), सीपीआयएफचे अधिकारी आणि तीनही संघांचे कर्णधार यांच्या मार्फत माहिती देण्यात आली. १९ मार्च ते २१ मार्च दरम्यान नियोजित या कार्यक्रमात प्रेक्षक तीन संघांमधील सात सामने पाहतील. विजेते १.५ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेसह उडचलो आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक (udChalo udChalo Armed Forces Cycle Polo Trophy) घेऊन जातील.
उडचलो (udChalo) हे एक अग्रगण्य ग्राहक टेक स्टार्ट अप आहे जे केवळ सशस्त्र दलांना सेवा देते आणि भारताच्या संरक्षण दलासाठी एक सुपर अॅप म्हणून ते तयार केले आहे आणि ते आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ अधिकृत प्रायोजक आहेत.
आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ चे कार्यक्रम व्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल श्री. भारत पन्नू म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या बाबतीत भारतीय सशस्त्र दल नेहमीच आघाडीवर असते. आपल्या देशाच्या सायकल पोलो संघाने सायकल पोलो विश्व चषक स्पर्धेत ६ वेळा सुवर्णपदक मिळवून आपला अभिमान वाढवला आहे. या खेळाला योग्य मान्यता मिळण्याची हीच वेळ आहे आणि एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या सशस्त्र दलांमध्ये हे जे खेळाडू घडवतो त्या अप्रतिम खेळाडूंच्या कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ.”
सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी श्री. के. के. सोनी म्हणाले, “सायकल पोलो हा एक अत्यंत गतिशील व प्रचंड उर्जेने भरलेला असा खेळ आहे ज्यामध्ये हॉर्स पोलोची चपळता आणि सायकलिंगचा वेग व तीव्रता यांचा मेळ आहे. हा एक रोमांचक खेळ असून शारीरिक दृष्ट्याो ताकद व ऊर्जेची गरज असलेला खेळ आहे. ज्यासाठी कौशल्य, अचूकता आणि टीमवर्क आवश्यक आहे. अहमदनगरला पहिल्यांदाच हा अनोखा खेळ अनुभवायला मिळणार आहे. आम्ही आमच्या देशात खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा विचार करत आहोत आणि पुढच्या यशस्वी हंगामाची वाट पाहत आहोत. संघांच्या कर्णधारांना माझ्या शुभेच्छा.”
या स्पर्धेच्या माध्यमातून सशस्त्र दल सायकल पोलो या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची जोपासना वाढवण्यासाठी समर्पित आहे.
भारतीय वायुसेनेच्या संघाचे नेतृत्व जेडब्ल्यूओ (JWO) विष्णू एस करतील आणि जेडब्ल्यूओ (JWO) असरुद्दीन शा हे संघाचे प्रशिक्षक असतील. भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स संघाचे नेतृत्व लेफ्ट्नंट पीयूष कुमार सिन्हा करतील तर लेफ्ट्नंट विनोद कुमार हे संघाचे प्रशिक्षक असतील. प्रादेशिक लष्कराच्या संघाचे नेतृत्व सिपाही सनोफर करतील तर या संघाचे प्रशिक्षक हविलदार अंशद ए असतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!