अ.नगरला किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी ; दोन्ही गटाचे ९ आरोपींना अटक

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दोन्ही गटाचे ९ आरोपींना तात्काळ अटक करण्याची कारवाई कोतवाली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त केली.
अटक संबंधितांना न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि. विवेक पवार, पोसई. सोपान गोरे, पोसई. तुषार धाकराव, पोसई. मनोज कचरे, सफौ. संजय खंडागळे, सफौ.राजेंद्र वाघ, पोहेकॉ. तनवीर शेख, संदीप पवार, मनोज गोसावी, विश्वास बेरड, पोना. योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, रविंद्र घुगासे, राहीत यमुल, भिमराज खरसे, मयुर गायकवाड यांचे संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

दि. २४ एप्रिल २०२३ रोजी रात्री अहमदनगर शहरातील शेरकर गल्ली, बारातोटी कारंजा, माळीवाडा परिसरात लहान मुलांचे वादातून दोन गटात भांडण होवुन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सदर घटनेची माहीती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सोबतचे पोलीस अंमलदारासह तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जमलेल्या दोन्ही गटाचे जमावास शांत रहाण्याचे अवाहन केले. जमाव मोठया प्रमाणावर असल्याने तात्काळ अधिक कुमक बोलावून जमाव पांगवून गुन्हयातील जखमीचे तक्रारीवरुन वेगवेगळे दोन स्वतंत्र गुन्हे भादवि क, ३०७,१४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ वगैरे प्रमाणे दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे सुद्धा अतिरिक्त पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
गुन्हयात सौ. सुरेखा आदिनाथ लगड रा. शेरकर गल्ली, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन १) अबु सलीम इम्रान सय्यद २) उजेस सय्यद ३) माजीद खान ४) आरबाज शेख ५) उमेर सय्यद ६) अबु सय्यद ७) फैज बागवान ८) ताहीर खान ९) साहील शफीक बागवान १०) ओजेर इसहाक सय्यद ११) माजीद मुर्तुजा शेख १२) जाफर रज्जाग बागवान इतर ७ ते ८ अनोळखी इसम यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दुस-या गुन्हयात जिया ताहीर शेख रा. पंचपिर चावडी, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन १) धिरज परदेशी २) सागर आहेर ३) ओमकार भागानगरे ४) शुभम कोमाकुल ५) ओमकार घोलप ६) यश घोरपडे ७) तेजय मराठे ८) तेजस नंदकुमार खाडे व इतर ५ ते ६ अनोळखी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीसांनी तात्काळ दोन्ही गटाचे मिळून अटक केलेले आरोपी पुढील प्रमाणे १) शुभम उर्फ परश्या नागेश कोमाकुल २) साहील शफिक बागवान ३) ओमकार पांडुरंग भागानगरे ४) ओझेर इसहाक सय्यद ५) यश सुनिल घोरपडे ६) माजिद मुर्तुजा शेख ७) तेजस उर्फ सोन्या चक्रधर मराठे ८) जाफर रज्जाक बागवान ९) तेजस नंदकुमार खाडे व दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हयातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीसांचे पथके रवाना झालेले आहेत. अटक आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट अहमदनगर येथे हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोतवाली पोलीस निरीक्षकांचे आवाहन-
छोट्या वादातून मोठ्या घटना घडत असतात एखादी छोटी घटना जरी घडली तरी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी समाधान न झाल्यास पोलीस निरीक्षक यांना स्वतः भेटावे त्यावर कडक कायदेशीर करण्यात येईल, स्वतः कायदा हातात घेऊ नये. किरकोळ वाद जरी असेल तरी कोतवाली पोलिसांना कळवा असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!