अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय संविधानाची माहिती दिली, तसेच संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल, पाटील, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.