‘अहिल्यानगर एलसीबी’ची मोठी कारवाई ः अवैध दारु कोटींचा मुद्देमाल जप्त

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः गोवा येथून इंदौर, मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेली अवैध दारू ‘अहिल्यानगर एलसीबी’ने पकडली आहे. या कारवाईत 1 कोटी 2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त व प्रलोभनमुक्त होण्यासाठी अवैध दारू व इतर बाबतीत कारवाई करण्यासंदर्भात निवडणुक आयोगाने निर्देश दिलेले आहे.निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने अहिल्यानगर एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्याविरुध्दात कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री.आहेर यांनी एलसीबीचो पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, शरद बुधवंत, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, जालींदर माने, प्रशांत राठोड, अर्जुन बडे तसेच रविंद्र कर्डिले व मेघराज कोल्हे यांच्या टीमला अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
एलसीबी टीमने दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार एलसीबी टीमने दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास दळवीवस्ती, बायपास रोड, आरणगाव शिवार (ता.अहिल्यानगर) या ठिकाणी जाऊन सापळा रचला. दरम्यान माहितीतील वाहन येतांना दिसल्याने ट्रक चालकास थांबवून पंचासमक्ष ट्रक चालकास व वाहनामधील एकाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव दीपक आदिकराव पाटील (ट्रकचालक/ मालक, वय 45, रा.धामवडे, रा.शिराळा, ता.सांगली), चालक शहाजी लक्ष्मण पवार (रा.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा), शैलेश जयवंत जाधव (वय 35, रा.इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली) असे सांगितले. ट्रकमधील विदेशी दारूबाबत माहिती विचारपूस केली असता त्यांनी विदेशी दारू ही हेमंत शहा (रा.401 ए विंग, चौथा माळा, लोटस शोरूमजवळ, इंदौर, मध्यप्रदेश हल्ली रा.मडगाव गोवा), सायमन उर्फ मायकल (पूर्ण नाव माहित नाही), जमीर मुलाणी (रा.मलकापूर मार्केटजवळ, ता.कराड, जि.सातारा) याच्या मालकीचे आहे. ही आम्ही सुखदेवसिंग गिल उर्फ कवलजितसिंग भूल्लर उर्फ लवीशेठ (रा. 10000 एएम नायकनगर, शॉप नं.03, रिंगरोड, इंदौर मध्यप्रदेश) यास देण्याकरीता घेऊन जात होतो असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमध्ये 66 लाख 24 हजार रू.कि. इAॠझखझएठ ऊएङणदए थकखडघध तसेच 36 लाख रू.किं. ट्रक क्र.(चक11-Aङ6248), 45 हजार रू.कि.आरोपीकडील मोबाईल असा एकूण 1 कोटी 2 लाख 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेले दिपक आदिकराव पाटील (ट्रकचालक/मालक, वय 45, रा.धामवडे, रा.शिराळा, ता.सांगली), चालक शहाजी लक्ष्मण पवार (रा.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा), शैलेश जयवंत जाधव (वय 35, रा.इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली), फरारी असणारे हेमंत शहा (रा.401 ए विंग, चौथा माळा, लोटस शोरूमजवळ, इंदौर, मध्यप्रदेश हल्ली रा.मडगाव गोवा), सायमन उर्फ मायकल (पूर्ण नाव माहित नाही), जमीर मुलाणी (रा.मलकापूर मार्केटजवळ, ता.कराड, जि.सातारा) व सुखदेवसिंग गिल उर्फ कवलजितसिंग भूल्लर उर्फ लवीशेठ (रा.10000 एएम नायकनगर, शॉप नं.03, रिंगरोड, इंदौर मध्यप्रदेश) यांच्याविरुध्द एलसीबीचे पोकॉ जालींदर माने यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 788/2024 बीएनएस कलम 318(4), 336(3), 340(2), 341(2), 3(5)सह महा.प्रो.का.कलम 65 (बी) (ई) (एफ), 66 (1)(बी), 80 (1) (2), 81, 83, 90, 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!