संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर शहरात दि.१० मार्च रोजी साजरा होणारा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा व्हावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येतं असून मिरवणूक मार्गावर CCTV कँमेरे बसविण्यात येत आहेत.
पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ अधिकारी प्रशांत खैरे अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे शिवजयंती उत्सव मार्गावर चोख बंदोबस्त ठेवत असून मिरवणूक मार्गाची पाहणी देखील केली आहे.
अहमदनगर शहरात होणारे वाद विवाद लक्षात घेता मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर दिल्लीगेट पर्यंत तब्बल 35 पेक्षा जास्त कँमेरे लावण्यात येणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी मिरवणुकीत लाईट गेल्यास मिरवणूक मार्गाच्या मुख्य चौकात CCTV सह लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच साजरी होणारी शिवजयंती उत्साहात पार पाडावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे उपस्थितीत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बैठका देखील घेतल्या आहेत. आहे. त्यामुळे शहरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली आहे.
कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे, पोलीस जवान योगेश खामकर, अभय कदम, उमेश शेरकार हे करत आहेत.